घरमहाराष्ट्रनाशिकसप्तश्रृंगी गड : करवाढ कुणामुळे?

सप्तश्रृंगी गड : करवाढ कुणामुळे?

Subscribe

सूचक, अनुमोदक सापडेना; सदस्यांनी झटकले हात

नाशिक : सप्तश्रृंगी देवीच्या गडावर येणार्‍या भाविकांना प्रतिव्यक्ती पाच रुपये यात्राकर लावण्यास जिल्हा परिषदेने मंजूरी दिल्यानंतर त्या ठरावाचे सूचक व अनुमोदक सापडत नसल्याचे दिसून आले आहे. नेमका ठराव कुणी मांडला? असा प्रश्न जिल्हा परिषदेला पडला आहे.साडेतीन शक्तीपिठांमध्ये स्थान असलेल्या सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांकडून प्रती व्यक्ती 5 ते 20 रुपये कर आकारणी करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत तसा ठराव मंजूर करण्यात आल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. परंतु, स्थायी समितीच्या सभेत हा विषयच उपस्थित झालेला नसल्याने त्याला परवानगी देण्याचा विषयच उद्भवत नसल्याचे स्थायी समितीच्या सदस्यांनी म्हटले आहे.

मूळात 14 जानेवारी 2022 रोजी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत फक्त दोनच सदस्य सहभागी झाले होते. त्यामुळे कोरमअभावी सभा तहकूब व्हायला हवी होती. परंतु, सभेचे कामकाज 10 मिनिटात पूर्ण झाले आणि सर्व विषय मंजूर करण्यात आल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. विषय पटलावर यात्रा करवाढीचा विषय असल्यामुळे त्याला मंजूरी मिळाली व सामान्य प्रशासन विभागाने कामापुरती नक्कल देत सप्तश्रृंग ग्राम पंचायतीला यात्राकर आकारण्यास परवानगी मिळाल्याचे सांगितले जात आहे. परंतु, या संपूर्ण प्रक्रियेत या विषयाला मंजूरी कुणी दिली? याचा अद्याप शोध लागलेला नाही. सभा ऑनलाईन असल्यामुळे असा विषयच उपस्थित न झाल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे. प्रशासनाने हा ठराव सभेनंतर केल्याचे सदस्यांनी म्हटले आहे. त्यामुळे स्थायी समिती सदस्यांना अंधारात ठेवून प्रशासनाने हा ठराव केल्याचे उघड झाले आहे.

  • जिल्हा परिषद फक्त परवानगी देण्यासाठीच का?
    ग्रामपंचायत कर आकारणी करते आणि त्याची परवानगी जिल्हा परिषद देते. एकूण उत्पादनातून 50 टक्के हिस्सा जिल्हा परिषदेच्या सेस निधीत जमा करण्याची मागणी स्थायी समितीच्या सदस्यांनी केली आहे.
Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -