घरCORONA UPDATEधक्कादायक : नामपूर रुग्णालयातील डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह

धक्कादायक : नामपूर रुग्णालयातील डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह

Subscribe

नामपूर (ता. बागलाण) येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना करोनाची लागण झाली असल्याची माहिती मालेगाव सामान्य रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली आहे. ते मालेगाव येथून ये – जा करतात. त्यांना मालेगाव येथे वास्तव्यास असलेल्या पत्नीपासून करोनाची लागण झाल्याचा अहवाल मालेगाव सामान्य रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाला आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्यांना करोनाची लागण झाल्याप्रकरणी  दैनिक ‘आपलं महानगर’तर्फे तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी यांचेकडे माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्यास दुजोरा दिला आहे. तसेच, टेंभे ग्रामपंचायतीचे सरपंच भाऊसाहेब अहिरे यांनी वृत्तास दुजोरा दिला. नामपूर परिसरात अनेक दिवसांपासून ग्रामीण रुग्णालयात किती रुग्ण गेले आहेत. याचा शोध आता तालुका वैद्यकीय अधिकारी व प्रशासनावर येवून ठेपणार आहे. या चर्चेमुळे मोसम खोऱ्यात भीतीचे वातावरण आहे.

- Advertisement -

नामपूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी तसेच त्यांच्या पत्नी व रुग्णवाहिकेचा चालकही संशयाच्या चौकटीत उभे राहिले असल्याचेही चर्चा आता रंगू लागली आहे. यामुळे करोना विषाणू घरात घुसल्याचा प्रयत्न झाला आहे. प्रत्येकानेे किती सतर्क राहायचे हे आता प्रत्येक बागलाणकरांवर येवून ठेपले आहे. मालेगाव सामान्य रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. डांगे यांच्याकडून दुजोरा मिळाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -