घरमहाराष्ट्रनाशिकऑनलाईन ‘नेट’ परीक्षेमुळे निकाल उंचावणार

ऑनलाईन ‘नेट’ परीक्षेमुळे निकाल उंचावणार

Subscribe

तज्ज्ञांचे मत: वस्तूनिष्ठ स्वरुपाचे 150 प्रश्न; तीसरा पेपर रद्द झाल्याने वेळेची बचत; सेट ही ऑनलाईन होणार

विद्यापीठांमध्ये सहायक प्राध्यापक होण्यासाठी आवश्यक नॅशनल इलिजिब्लिटी टेस्ट (नेट) परीक्षा यापुढे ऑनलाईन स्वरुपात घेण्यात येणार आहे. येत्या डिसेंबर महिन्यात तिसर्‍यांदा ऑनाईलन स्वरुपात होणारी ही परीक्षा होत आहे. या परीक्षेचे स्वरुप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी झाले असून, युजीसीने तिसरा पेपर रद्द केल्यामुळे निकाल अधिक उंचावण्याची शक्यता सेट, नेटच्या तज्ञांनी ‘आपलं महानगर’कडे व्यक्त केली.

राष्ट्रीय स्तरावर प्राध्यापक होण्यासाठी मान्यता असल्यामुळे नेट परीक्षेला अनन्यसाधारण महत्व आहे. या परीक्षेची काठिण्य पातळी वाढलेली असल्याने निकालचे प्रमाण 5 टक्क्यांच्या आत राहिले होते. त्यामुळे वर्षानुवर्ष अभ्यास करुनही विद्यार्थ्यांना फारसे यश प्राप्त होत नव्हते. परिणामी, ‘नेट’ पेक्षा स्टेट इलिजिब्लिटी टेस्टला (सेट) प्राधान्य दिले जात होते. मात्र, आता या दोन्ही परीक्षांचे स्वरुप एकसारखे झाल्यामुळे निकाल अधिक लागण्याची शक्यता आहे. पूर्वी तीन पेपर सोडवण्याची आवश्यकता होती. आता केवळ दोनच पेपर सोडवण्याची गरज राहिली असून, त्यापैकी पहिला पेपर हा एकसारख्या काठिण्य पातळीचा ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पहिला पेपर अनुउत्तीर्ण झाले तरी फारसा फरक पडत नाही. दुसरा पेपर अर्थात विषयाशी निगडीत प्रश्नपत्रीका व्यवस्थितरित्या सोडवल्यास त्यात उत्तीर्ण झाले तरी नेट उत्तीर्ण समजले जाते. त्यामुळे पहिल्या पेपरचे टेन्शन जवळपास संपले आहे. यात 100 गुणांसाठी 50 प्रश्न विचारले जातात. तसेच पेपर क्रमांक दोनमध्ये 200 गुणांसाठी 100 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असल्यामुळे पेपर वेळेत सोडवणे सहज शक्य होते.

- Advertisement -

पहिल्या पेपरसाठी एक तास आणि दुसर्‍या पेपरसाठी दोन तास अशा सलग तीन तासांमध्ये संपूर्ण परीक्षा संपते. दोन पेपरमध्ये ब्रेक घेण्याची किंवा जास्त वेळ बसून राहण्याची आवश्यकता न राहिल्यामुळे विद्यार्थ्यांचे टेन्शन कमी झाले आहे. दरम्यान, यूजीसी- नॅशनल इलिजिब्लिटी टेस्ट (यूजीसी- नेट) ही परीक्षा संगणकाद्वारे घेतली जाईल. 2 ते 6 डिसेंबरदरम्यान होणार्‍या या परीक्षेला प्रविष्ट होण्यासाठी 9 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. 31 डिसेंबरला निकाल जाहीर केला जाणार आहे.

सेटही होणार ऑनलाईन

यूजीसी-नेट प्रमाणेच यापुढे स्टेट इलिजिब्लिटी टेस्ट (सेट) ही परीक्षादेखील ऑनलाईन स्वरुपात घेतली जाणार आहे. त्यासाठी विद्यापीठ स्तरावर नियोजन सुरु झाले असून, अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, तज्ञांच्या म्हणण्यानुसार सेट व नेट या दोन्ही परीक्षांचे स्वरुप एकसारखे झाल्यामुळे या परीक्षा ऑनलाईन स्वरुपातच घेतल्या जातील. त्यादृष्टीने तयारी सुरु करण्यात आली असून लवकरच त्याची घोषणा केली जाणार असल्याचे म्हटले जाते.

- Advertisement -

विद्यार्थी केंद्री ही परीक्षा झाली आहे

सेट व नेट परीक्षा पध्दतीत सकारात्मक बदल केल्यामुळे आता विद्यार्थी केंद्री ही परीक्षा झाली आहे. नेट परीक्षा अत्यंत सोपी झाल्याने निकाल अधिक उंचावण्याची शक्यता आहे. सेट परीक्षा देखील ऑनलाईन स्वरुपात होणार असल्याने त्याचा परीक्षार्थींना फायदा होईल. -प्रा. देवीदास गिरी, सेट मार्गदर्शक, नाशिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -