घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक : नाईक शिक्षण संस्थेसाठी शनिवारी मतदान

नाशिक : नाईक शिक्षण संस्थेसाठी शनिवारी मतदान

Subscribe

6808 सभासद बजावणार हक्क; संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात 39 बुथ

क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षणसंस्थेचा पंचवार्षिक निवडणूकीसाठी शनिवार (दि.20) रोजी मतदान होत आहे. निवडणूक मंडळाकडून तयारी पुर्ण झाली असून 39 बुथवर सहा हजार 808 मतदार आपला हक्क बजावणार आहेत. दरम्यान, सत्ताधारी प्रगती आणि क्रांतीवीर पॅनलमध्ये मुख्य लढत रंगली आहे.

अध्यक्ष, उपाध्यक्षांसह ज्येष्ठ विश्वस्त मंडळ, पदाधिकारी व कार्यकारी मंडळाचे सदस्य अशा एकूण 29 जागांसाठी कॅनडा कॉर्नरवरील नाशिक मुख्यालयात मतदान होणार असून रविवारी (21) गंगापूररोड वरील चोपडा हॉल येथे होणार आहे. संस्थेचे 8608 सभासद मतदानाचा हक्क बजावणार आहे. मतदानासाठी 39 बुथवर 351 कर्मचारी काम करणार आहे. तर त्यांना 15 मदतनीस राहणार आहे. एका बुथवर शाई लावण्यासाठी 1 कर्मचारी, एक कर्मचारी आयडी प्रुफ बघण्यासाठी, एक कर्मचारी मतदार यादीतील नावे बघण्यासाठी 1 शिपाई मतपत्रिका देण्यासाठी, 1 शिपाई गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि या सर्वाना मतदतीसाठी इतर कर्मचारी असे 9 कर्मचारी राहणार आहे. मतदानाची वेळी सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यत आहे. मतदानाला येताना शासकीय मान्यताप्राप्त ओळखपत्र घेऊन यावे, असे आवाहन करण्यात निवडणूक मंडळातर्फे करण्यात आले आहे. निवडणूक मंडळात अध्यक्ष अ‍ॅड. गजेंद्र सानप, अ‍ॅड. अशोक कातकाडे, अ‍ॅड. संतोष दरगोडे यांचा समावेश असून, लवाद म्हणून अ‍ॅड. एस. जी. सोनवणे काम बघत आहे.

- Advertisement -

निवडणूक सीसीटीव्ही कॅमेरामध्ये होणार कैद

दरम्यान कुठलाही अनुचीत प्रकार घडू नये, या करीता संपुर्ण मतदान प्रकीया ही सीसीटीव्हीत कैद होणार आहे. तसेच मतदान आणि मतमोजणीसाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती अ‍ॅड.गजेंद्र सानप यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -