घरताज्या घडामोडी’ट्रान्सफार्मर’साठी दीड लाख मागणारे महावितरणचे अभियंते जाळ्यात

’ट्रान्सफार्मर’साठी दीड लाख मागणारे महावितरणचे अभियंते जाळ्यात

Subscribe

बांधकाम सुरु असलेल्या प्रकल्पावर ९५ इलेक्ट्रीक वीजमीटर देण्यासाठी व वीज पुरवठ्याचा ट्रान्सफॉर्मर बसवण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून १ लाख ६५ हजार रुपयांची लाच मागणार्‍या महावितरण कंपनीतील दोन अभियंत्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. अतिरिक्त कार्यकारी अभियंता कृष्णराव अरविंद श्रृृंगारे आणि सहायक अभियंता मंगेश प्रभाकर खरगे अशी दोघा संशयित लाचखोरांची नावे आहेत.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी वीजमीटर व ट्रान्सफॉर्मर बसवून देण्यासाठी महावितरणकडे अर्ज केला. अहवाल मंजूर करण्याच्या मोबदल्यात कृष्णराव श्रृंगारे यांनी १ लाख २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तसेच, मंगेश खरगे यांनीही तक्रारदाराकडे ४५ हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारीची शहानिशा करुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने इंदिरानगर येथील महावितरणच्या कक्ष कार्यालयात पंचासमोर संशयितांनी लाचेची मागणी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तक्रारीवरुन भद्रकाली पोलीसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -