घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रतीन महिन्यांनंतरही बालभारतीच्या पुस्तकांची वाणवा; अतिरिक्त छपाई

तीन महिन्यांनंतरही बालभारतीच्या पुस्तकांची वाणवा; अतिरिक्त छपाई

Subscribe

नाशिक : कोरोनाकाळात कधी ऑनलाईन तर कधी ऑफलाईन शाळा सुरु राहिल्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांचे वार्षिक वेळापत्रक बघिडले असताना जून 2022 पासून नियमितपणे शाळा सुरु झालेल्या आहेत. शाळा सुरु होऊन तीन महिने झाले तरी विद्यार्थ्यांना पाठ्यक्रमाची पुस्तके मिळालेली नाहीत. वाढती मागणी व पालकांच्या पाठपुराव्यामुळे आता महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने पुस्तकांची छपाई पुन्हा सुरू केली आहे.

पुणे येथील महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडे राज्यातील 9 विभागीय केंद्रांतर्फे पुस्तकांची मागणी नोंदवली जाते. मागणीनुसार शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी पुरवठा केला जातो. मार्च 2020 पासून कोरोनामुळे शैक्षणिक वेळापत्रकच कोलमडले. गेल्यावर्षात कधी ऑनलाईन तर ऑफलाईन शाळा सुरू राहिल्यामुळे पुस्तकांची मागणीच विभागीय केंद्रांना नोंदवता आली नाही. नोंदवलेल्या मागणीनुसार पुस्तकांचे वितरण करणे शक्य होईल की नाही, या गोंधळात पुस्तकांची छपाई करण्यास विलंब झाला. हे वर्ष असेच उलटून गेल्यानंतर जून 2022 पासून शाळा प्रत्यक्ष सुरु झाली. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला पुस्तके आवश्यक असल्याने त्याप्रमाणे पाठ्यपुस्तक मंडळाच्या नाशिक विभागीय केंद्राने पुस्तकांची मागणी नोंदवली. परंतु, विद्यार्थ्यांच्या तुलनेत कमी पुस्तके आल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकही चिंतेत सापडले आहेत. इयत्ता तिसरेचे इव्हीएस, समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून मोफत वाटण्यात येणारी पुस्तके बाजारातही उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

राज्य पाठ्यपुस्तक मंडळाकडे राज्यातील नऊ विभागीय भांडार कक्षांनी पुस्तकांची मागणी केली आहे. त्यांची छपाई लवकरच होणार असून, सप्टेंबरअखेर विद्यार्थ्यांच्या हाती पडतील. : कृष्णकुमार पाटील, संचालक राज्य पाठ्य पुस्तक मंडळ-पुणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -