Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र नाशिक शहरातील उघडया विहिरीत मृतदेह आढळल्याने खळबळ

नाशिक शहरातील उघडया विहिरीत मृतदेह आढळल्याने खळबळ

Subscribe

नाशिक : पाथर्डी फाटा परिसरातील स्वराज्य नगर या भागात एका उघड्यावर असलेल्या विहिरीत ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आल्याने परीसरात एकच खळबळ उडाली.

संतोष नारायण कांबळे ( वय वर्ष 30 रा. स्वराज्य नगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत संतोष कांबळे हा एका इमारतीत वॉचमन म्हणून रहात होता. त्याच बरोबर तो बांधकाम कामगारांचे देखील काम करत होता. रविवार (दि.७) पासून संतोष बेपत्ता झाला होता. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

- Advertisement -

संतोष कांबळे यांचा भाऊ बाळू कांबळे याने सर्वत्र शोध घेतला. पण तो कुठेच सापडला नाही. ज्या इमारतीमध्ये तो राहत होता त्या इमारतीच्या पाठीमागील इमारतीच्या समोर राहत असलेल्या कविता मौले या पाण्याची मोटर सुरू करण्याकरिता विहिरीजवळ गेल्या असता त्यांना विहिरीत पाण्यात मृतदेह तरंगताना दिसून आला. त्यांनी तात्काळ याबाबतची माहिती मयताचा भाऊ बाळू कांबळे याला दिली.

घटनेची माहिती इंदिरानगर पोलीस ठाण्याला देण्यात आली. ही बातमी कळताच घटनास्थळी इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले . मयत संतोष कांबळे यांच्या पश्चात पत्नी मुलगा, मुलगी ,आई वडील, दोन भाऊ , बहीण असा परिवार आहे. यावेळी इंदिरानगर पोलीस ठाण्याचे हवलदार सुधाकर आव्हाड , सुनील गांगुर्डे , कुलदीप पवार , दिनेश देवरे या ठिकाणी उपस्थित होते.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -