घरमहाराष्ट्रनाशिकअखेर, हिरे कुटुंबाशी संबंधित मालेगावातील 'त्या' रेणुकादेवी यंत्रमाग संस्थेवर जिल्हा बँकेची कारवाई

अखेर, हिरे कुटुंबाशी संबंधित मालेगावातील ‘त्या’ रेणुकादेवी यंत्रमाग संस्थेवर जिल्हा बँकेची कारवाई

Subscribe

नाशिक : रेणुकादेवी यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित दयाने, ता. मालेगाव या संस्थेकडे बँकेचे मुद्दल ७ कोटी ४६ लाख येणेबाकी असून दि. 30 एप्रिलला व्याजासह ३१ कोटी थकीत झाल्याने बँकेने संस्थेची सरफेशी कायद्यांअंतर्गत जप्ती केलेली आहे. सुत्रांकुडून मिळालेल्या माहिती नुसार, या संस्थेची जानेवारीमध्ये मशिनरी विक्री करण्यात आलेली आहे. संस्थेची तारणी स्थावर (जमीन/व त्यावरील बांधकाम ) मालमत्ता विक्री संबंधात बँकेकडून लवकरच फेरलिलाव निविदा वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे असे समजते. संचालकानी दिलेल्या हमी पत्रानुसार सहकार न्यायालयातही बँकेने दावा दाखल केलेला आहे. या संस्थेच्या पदाधिकार्‍यांविरुद्ध रमजानपुरा पोलीस स्टेशन मालेगावला गुन्हा दाखल आहे.

ज्यावेळेस बंकेने कर्ज दिले होते त्यावेळीच्या व्यवस्थापनाने बँकेला ठराव दिला होता की, आम्ही या कर्जाला व्यक्तीशा: व सामुहिकरित्या जबाबदार आहोत. या ठरावानुसार अ‍ॅटेचमेंट बिफोर अवार्ड घेणार आहोत. यामुळे व्यवस्थापनात असलेल्या संचालकाला त्यांची प्रॉपर्टी डिस्पॉज आॅफ करता येणार नाही. या कारवाईपासून वाचण्यासाठी संस्थांनी त्वरीत कर्जभरणा करावा. : प्रतापसिंह चव्हाण, प्रशासक, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

बिगरशेती संस्थाकडील कर्जवसुलीसाठी सक्तीची मोहिम

बँकेच्या मासिक बैठकीत बिगरशेती संस्थांकडील कर्जवसुलीचा आढावा घेतला असता स्थावर मालमत्ता शोधून त्यावर बँकेचा बोजा निर्माण करण्यात यावा व थकीत कर्जाची वसुलीसाठी कारवाई करावी असा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता बँकेचे वरिष्ठ बिगरशेती संस्थांकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकी असल्याने या वसुलीकरिता तत्कालीन संचालकांकडून अधिकारी प्राधिकृत करण्यात आले आहे. सदर प्राधिकृत अधिकार्‍यांनी कायदेशीर सल्ला घेत संबंधीत थकबाकीदार संस्थांवर कायदेशीर कारवाया करण्यात याव्यात असे सक्त निर्देश देण्यात आलेले आहेत. तसेच इतर बिगर शेती सहकारी संस्थाच्या संचालकांवर व संबधीत अधिकार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्या बाबतच्या नोटीसा बाजवण्यात आल्या आहेत. तरी ज्या ज्या संस्थांकडे कर्जवसुली बाकी आहे त्यांनी त्वरीत कर्जभरणा करुन वसुलीच्या कारवाईपासून मुक्तता मिळवावी असे आवाहन बँकेतर्फे करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -