Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र नाशिक भिंत कोसळून पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

भिंत कोसळून पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

देवळा तालुक्यात गाढ झोपेत असलेल्या कुटुंबावर कोसळली भिंत

Related Story

- Advertisement -

वादळी वारा आणि पावसामुळे मातीच्या घराची भिंत कोसळून पाच वर्षीय लहानग्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना देवळा तालुक्यातल्या सावकीत घडली. आदिवासी वस्तीत झालेल्या या घटनेत कुटुंबातील दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले.

पठाण कचरू सोनवणे यांचं कुटुंब गुरुवारी झोपेत असताना मध्यरात्री साडेबारा वाजेदरम्यान वादळी वारा आणि पावसामुळे घराची एक भिंत अचानक कोसळली. त्याखाली पठाण यांच्यासह त्यांच्या पत्नी सुनीता, पाच वर्षीय मुलगा आकाश आणि सातवर्षीय मुलगा कुणाल दबले गेले. भिंत कोेसळल्याचा आवाज येताच ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत ढिगार्‍याखाली दबलेल्या सर्वांना बाहेर काढलं आणि उपचारासाठी रुग्णालयात पाठवलं. मात्र, रस्त्यातच आकाश सोनवणे या चिमुकल्याचा मृत्यू झाला. या कुटुंबाला सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केलीय.

- Advertisement -