घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकरोडच्या कॉलेजकडून सव्वाशे विद्यार्थिनींना गंडा

नाशिकरोडच्या कॉलेजकडून सव्वाशे विद्यार्थिनींना गंडा

Subscribe

संस्थेकडून परीक्षेच्या फेरनियोजनाचं आश्वासन, विद्यापीठाशी संपर्क साधून चर्चा सुरू

प्रवेशाच्या नावाने सव्वाशे विद्यार्थिनींना नाशिकरोडच्या एका कॉलेजने गंडा घातल्याचं उघड झालंय. यामुळे विद्यार्थिनींचं वर्षं वाया जाणार आहे. के. एन. केला कॉलेजात परिसरातल्या अनेक महिलांनीही अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रवेश घेतलाय. कोरोनामुळे दोन वर्षांपासून कॉलेज बंद आहे. सुमारे सव्वाशे विद्यार्थिनींनी या कॉलेजात प्रवेश घेतलाय. त्यासाठी प्रत्येकीने साडेचार हजार रुपये भरले.

विद्यापीठाच्या परीक्षा सुरू झाल्याने, मंगळवारी रात्री एका विद्यार्थिनीला मोबाईलवर वेळापत्रक आलं. त्यानुसार सव्वाशे विद्यार्थिनींचा पेपर होता. या विद्यार्थिनी काल पेपर देण्यासाठी गेल्या तेव्हा त्यांना परीक्षेचा कोडच मिळाला नाही. विद्यार्थिनींनी विद्यापीठात फोन लावले. तिथून कॉलेजशी संपर्क साधण्यास सांगण्यात आलं. शेवटी उशिरा विद्यार्थिनींचा प्रवेशच झाला नसल्याचं विद्यापीठाकडून कळवण्यात आलं. त्यामुळे पालकांसह विद्यार्थिनींनी संताप व्यक्त केला.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -