घरमहाराष्ट्रनाशिकबनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली लष्करात नोकरी

बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली लष्करात नोकरी

Subscribe

उपनगर पोलिसांत गुन्हा, सरकारचीच केली फसवणूक

पॅन कार्ड, आधार कार्ड, जन्माचा दाखला, शालेय प्रमाणपत्रांसह अन्य कागदपत्रांवर मूळ जन्मतारीख व नाव बदलत आंध्रप्रदेशातील एका तरुणाने सैन्य दलाची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. याप्रकरणी नाशिकरोड आर्टिलरी सेंटरमधील लान्स नायक यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

यदलापल्ली दुर्गाप्रसाद (रा. पुरुशोथापल्ली, वेस्ट गोदावरी, आंध्रप्रदेश) याने भारतीय सैन्य दलात सोल्जर या पदावर भरतीसाठी विविध शैक्षणिक व स्वतःकडील सरकारी कागदपत्रांमध्ये फेरफार केली. बनावट कागदपत्रे व दाखले तयार करत सैन्य दलात नोकरी मिळवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी लान्स नायक नवनाथ आव्हाड यांनी दिलेल्या तक्रारीवरुन उपनगर पोलिसांनी दुर्गाप्रसाद याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -