घरदेश-विदेशगँगमन, ट्रॅकमनची भरती कधी करणार?

गँगमन, ट्रॅकमनची भरती कधी करणार?

Subscribe

डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संसदीय अधिवेशनात सवाल उपस्थित केला.

दररोज ८० ते ८५ लाख नागरिक मुंबई उपनगरीय रेल्वेने प्रवास करतात. जीर्ण होत चाललेले रेल्वे मार्ग आणि रेल्वे पुलामुळे गेले अनेक दिवस सतत लोकल सेवेत अडथळा निर्माण होत असल्याचा मुद्दा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज संसदीय अधिवेशनामध्ये उपस्थित केला. रेल्वे मार्गांच्या दुरुस्तीचे काम करणारे रेल्वे कर्मचारी, गँगमॅन आणि ट्रॅकमॅन हे सुरक्षितता श्रेणी कर्मचारी वर्गात मोडले जातात. हे रेल्वे कर्मचारी अनेकदा नैसर्गिक प्रतिकूल परिस्थितीमध्येसुद्धा रेल्वे अपघात, रेल्वे प्रवाशांच्या गैरवर्तणुकीमुळे निर्माण झालेल्या प्रसंगात अथक काम करत असतात. त्यामुळे त्यांची रिक्त पदे कधी भरणार? असा सवाल खासदार श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित केला.

हेही वाचा – शिर्डी विमानतळाचा विस्तार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

दरम्यान, राज्य मंत्री सुरेश अंगडी चन्नबसप्पा यांनी यावर उत्तर देताना सांगितले की, ”गेल्या दोन वर्षात ७६२९४ गँगमॅन आणि ट्रॅकमॅन यांची भरती झाली असून निवृत्त कर्मचारी तसेच माजी कर्मचारी यांनासुद्धा सेवेमध्ये समावेश करुन घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच मुंबईतील लोकल सेवेवर दिवसा प्रंचड ताण असल्यामुळे रेल्वे मार्ग तसेच इतर कामे ही रात्री केली जात आहेत,” असे सांगितले.

- Advertisement -

कर्मचाऱ्यांच्या सन्मानपूर्वक राहणीमानासाठी प्रयत्न केले का?

रेल्वे ही देशातील सर्वात प्रभावी नियोक्ता मानली जाते. परंतु भारतीय रेल्वेमध्ये विविध विभागांतील सुमारे १.५ लाख सुरक्षा कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. मध्य रेल्वेमध्ये वर्ग श्रेणी-१ ते वर्ग श्रेणी-७ मधील ९८० पदे रिक्त आहेत तर पश्चिम रेल्वे मध्ये पूल बांधकाम विभागातील १४४ पैकी ३० टक्के ते ४० टक्के जागा रिक्त आहेत, असे स्पष्ट करताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज प्रश्नोत्तराच्या काळात रेल्वे मंत्रालयाकडून कुशल रेल्वे सुरक्षा श्रेणीतील कर्मचारी पदांची भरती प्रक्रिया कशाप्रकारे आणि कधीपर्यंत सुरु करणार आहे? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच गँगमॅन आणि ट्रॅकमॅन यांसारख्या सुरक्षा श्रेणीतील कर्मचाऱ्यांना सन्मानपूर्वक वातावरण उपलब्ध करत त्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने कोणती पावले उचलली आहेत? असा प्रश्नही खासदार श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे मंत्र्यांना विचारला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -