Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ‘ग्रंथ तुमच्या दारी’ योजना

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ‘ग्रंथ तुमच्या दारी’ योजना

वाचनाने माणसाचे जीवन समृद्ध होते- .डॉ. अशोक थोरात

Related Story

- Advertisement -

वाचनाने माणसाचे जीवन समृद्ध होते. साहित्यातून सुसंस्कृत समाज निर्माण होतो आणि वाचकांवर सुसंस्कार होत असतात. जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्ण यांना साहित्याच्या वाचनातून आनंद मिळेल आणि चार घटका आपल्या वेदना विसरता येतील असे काम ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्रमातून होणार आहे होईल, असे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्रमाची सुरुवात करताना व्यक्त केला. ‘ग्रंथ तुमच्या दारी’ उपक्रमांतर्गत शुक्रवारी (दि.३) नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ग्रंथपेटीचे हस्तांतरण करण्यातआले.त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीवास्तव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

त्यांनी ग्रंथपेटीचा स्वीकार केला. यावेळी ग्रंथ तुमच्या दारी उपक्रमाचे प्रमुख विनायक रानडे यांनी या उपक्रमाची माहिती दिली. रानडे म्हणाले, कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने जगभर पुस्तक पेटीचा उपक्रम राबविला जात आहे. वाचन संस्कृतीचा विकास व्हावा आणि माणसं जोडली जावी हा या उपक्रमाचा हेतू आहे. सुमारे सव्वादोन कोटी रुपयाची पुस्तके या उपक्रमांतर्गत जगभरात वाचकांपर्यंत पोहोचली आहेत. दीपक डोके फ्रेंड सर्कलच्या वतीने या ग्रंथपेटीची संकल्पना जिल्हा रुग्णालयात राबवण्यात आली. जिल्हा रुग्णालयातील रुग्णांबरोबरच येथील अधिकारी, कर्मचारी यांना या पुस्तकांचा उपयोग होईल. या समारंभास सार्वजनिक वाचनालयाचे कार्याध्यक्ष संजय करंजकर, प्रा. शंकर बोर्‍हाडे, दीपक डोके, उत्तम जाधव, आकाश सदावर्ते, दीपक गांगुर्डे , कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे रामदास जगताप यांच्यासह रुग्ण व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisement -