घर महाराष्ट्र नाशिक लाडक्या गणरायाला स्वताच्या हाताने साकारताना आनंदली चिमुकले

लाडक्या गणरायाला स्वताच्या हाताने साकारताना आनंदली चिमुकले

Subscribe

नाशिक : स्वत: गणेशमूर्ती तयार करताना चिमुकल्यांच्या चेहर्‍यांवर निर्माण होणारा उत्साह आणि आनंद काही औरच होता. कोणी लालगाब, तर कोणी दगडशेठ गणेशाच्या मूर्ती बनविल्या आणि त्याचे मनमोहक रूप साकारताच गणपती बाप्पा मोरया असा एकच जल्लोष केला. निमित्त होते, गणेशोत्सवानिमित्त सार्वजनिक वाचनालय, सानेगुरुजी कथामाला बालभवनतर्फे गो. ह. देशपांडे उद्यान व वाचनालय (गंगापूर रोड) येथे शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत पहिली ते चौथीच्या गटात निल सोनवणे आणि पाचवी ते दहावी गटात लावण्या बडगुजर या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकविला.

गणेशमूर्ती कार्यशाळेची सुरुवात बालभवन समिती सदस्या ज्योती फड – बोडके यांनी साने गुरुजींची खरा तो एकची धर्म ही प्रार्थना मधुर आवाजात म्हटली. कृष्णाजी जाधव यांचा परिचय गीता बागूल यांनी करून दिला. बालभवन प्रमुख प्रा. सोमनाथ मुठाळ यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. मार्गदर्शक कृष्णाजी जाधव व ज्योत्स्ना पाटील यांनी मुलांना गणपती मूर्ती बनविण्याविषयी थोडक्यात माहिती दिली. तसेच मुलांनी प्रत्यक्ष मातीपासून गणपती बनविण्याचा आनंद घेतला. कृष्णाजी जाधव व ज्योत्स्ना पाटील यांनी मुलांकडून गणेशमूर्ती तयार करून घेतल्या. पालक किरण बागूल यांनी स्पर्धा आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले. यावेळी वाचनालयाचे सांस्कृतिक कार्यसचिव संजय करंजकर, नाट्यगृह सचिव सुरेश गायधनी, कार्यकारी मंडळ सदस्य मंगेश मालपाठक, जयेश बर्वे, समिती सदस्य मंगेश बिरारी, डॉ. अजय कापडणीस, योगिनी जोशी, पौर्णिमा आंबेकर, सुचित्रा मोरे, अनामिका निंबाळकर, जितेंद्र अहिरराव आदीउपस्थित होते.

गणेशमूर्ती कार्यशाळेतील विजेते

  • पहिली ते चौथी गट
- Advertisement -

प्रथम : निल सोनवणे
द्वितीय : श्रिया दुसाने
तृतीय : शनाया शिंदे
उत्तेजनार्थ : अर्णव कर्जत, मोर्विका कापडणीस

  • पाचवी ते दहावी गट

प्रथम : लावण्या बडगुजर
द्वितीय : आनंद मोंठे / आरती मोंठे
तृतीय : संस्कृती पळसकर
उत्तेजनार्थ : सायली सातपूरकर, मैत्रियी गायधनी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -