घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र'गृहमंत्री राजीनामा द्या'; सटण्यात कडकडीत बंद, साक्री-शिर्डी महामार्गावर रास्तारोको

‘गृहमंत्री राजीनामा द्या’; सटण्यात कडकडीत बंद, साक्री-शिर्डी महामार्गावर रास्तारोको

Subscribe

नाशिक : जालना जिल्ह्यातील अंतरवाली (सराटी) येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ मंगळवारी (दि.५) शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून साक्री- शिर्डी महामार्गावर रास्तारोको करत कडकडीत बंद पाळण्यात आला. या आंदोलनात सकल मराठा समाजासह इतर समाज बांधवही सहभागी झाले होते. गृहमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली.अत्यावश्यक सुविधा वगळता बंद यशस्वी झाला.

मराठा आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत असतांना मंगळवारी (दि. ५) सकल मराठा समाजासह विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, डॉक्टर, मेडीकल, किराणा, वकील असोसिएशनचे पदाधिकारी शिवतीर्थाजवळ एकत्रित जमले. छत्रपती शिवरायांना अभिवादन करून नगर परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील साक्री- शिर्डी महामार्गावर ठाण मांडून रास्तारोको करण्यात आले. यावेळी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शासन आरक्षण शिस्तीत मागूनन देत नसेल तर दोन हात करून लढण्याची तयारी सकल मराठा समाजाने ठेवली आहे, अशा प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

- Advertisement -

आंदोलकांनी तीव्र शब्दांत राज्य शासनाचा निषेध नोंदवला. यावेळी देवळा, मालेगाव, ताहाराबाद मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनात डॉक्टर, मेडीकल, किराणा, वकील असोशिएशनसह इतर समाजाचे नागरिक, शेतकरी यांची एकजूट दिसली. अशीच एकजुट भविष्यात राहिली तर शासनाला समाजापुढे झुकावेच पडेल असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला.

तहसिलदार कैलास चावडे, प्रभारी पोलीस अधिकारी आयपीएस रजनीकांत चिलुमुला यांना अर्पिता सोनवणे, पूनम सोनवणे, सई सोनवणे या चिमुकलींच्या हस्ते निवेदन देण्यात आले. त्यानंतर आंदोलनाची सांगता झाली. सकल मराठा समाजाच्या आंदोलनात शहरातील व्यापार्‍यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन आपले व्यवहार बंद ठेवले होते. याव्यतिरिक्त शहरातील बँका, वैद्यकीय सेवा, औषधालय आदी अत्यावश्यक सेवा सुरू होत्या. सटाणा पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी चोख बंदोबस्त तैनात केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -