घरताज्या घडामोडीग्रामीण भागातही होणार घर, इमारत सील

ग्रामीण भागातही होणार घर, इमारत सील

Subscribe

गावे सील करण्याची गरज नाही

नाशिक शहरात आता कंटेनमेंट झोनच्या मर्यादा आखण्यात आल्या असून फक्त ज्या भागात रूग्ण आढळले आहेत त्या भागातील इमारतच यापुढे प्रतिबंधित करण्यात येणार आहे. याचधर्तीवर ग्रामीण भागातही कंटेनमेंट झोन मर्यादित करण्यात येणार असून केवळ रूग्णाचा वावर असलेला भागच सील केला जाईल गावच्या गाव प्रतिबंधित करण्याची आवश्यकता नसल्याची माहीती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

करोनाची साखळी तोडण्यासाठी करोनाबाधित रूग्ण आढळून आल्यानंतर संबधित व्यक्ती वास्तव्यास असलेल्या भागातील सुमारे ३ किलोमीटरपर्यंतचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणजेच कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केला जातो. त्यानूसार नाशिक जिल्हयात मालेगांवसह शहर आणि ग्रामीण भागात १८६ कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले. या भागात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार पुर्णपणे बंद ठेवण्यात येतात. ग्रामीण भागात गावे लहान असल्याने त्यातच जर कंटेनमेंट झोन एकापेक्षा अधिक झाले तर संपुर्ण गावच लॉकडाउन होते. त्यातच १४ दिवस हा भाग सील केला जात असल्याने नागरीकांची गैरसोय होते. त्यामुळे निर्माण होणारी कोंडी लक्षात घेता कंटेनमेंटच्या निकषात बदल करण्यात आले आहेत. पूर्वी ते ३ किलोमीटर परिसर प्रतिबंधित केला जात होता त्यानंतर अर्धा किलोमीटर नंतर ३०० मीटरवरून १०० मीटर परिसर प्रतिबंधित केला जात होता. मात्र शासनाच्या नवीन निकषानूसार आता केवळ करोनाबाधित रूग्ण आढळल्यानंतर रूग्ण राहत असलेली इमारतच सील करण्याचा निर्णय घेण्यात आला त्याचधर्तीवर ग्रामीण भागातही आता याच निकषानूसार कंटेनमेंट झोन तयार केले जाईल असे संकेत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत.

- Advertisement -

करोेनाबाधित रूग्ण सापडल्यानंतर त्याचा पुर्वतिहास तपासून घेण्यात येईल. त्यामध्ये रूग्ण राहत असलेल्या भागात अधिक फिरला असल्यास त्यानुसार कन्टेनमेन्ट झोनचा परिसर मोठा असेल. मात्र, रूग्ण हा अधिक कोठे फिरला नसेल, किंवा त्याच्या संपर्कात अधिक नागरिक आले नसतील तर अशा परिस्थिती संबंधित रूग्ण राहत असलेली इमारत व घराच्या जवळचा परिसर सील केला जाईल. ग्रामीण भागातही तो व्यक्ती राहत असलेली भाग, गल्लीच सील करण्यात येईल.
सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -