घरमहाराष्ट्रनाशिकरायगड चौकात घंटागाडीची २ महिन्यांपासून सुट्टी

रायगड चौकात घंटागाडीची २ महिन्यांपासून सुट्टी

Subscribe

पूर्वी या भागात नियमितपणे घंटागाडी येत होती. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून तर घंटागाडी येत नाही.

नाशिक :  सिडकोतील रायगड चौकातील महापालिका शाळेजवळ गेल्या दोन महिन्यांपासून कचरा संकलनासाठी घंटागाडी येत नसल्याने संतप्त महिलांनी माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांची भेट घेत व्यथा मांडली. याप्रश्नी तातडीने लक्ष घालण्याचे आश्वासन बडगुजर यांनी दिले.

 यावेळी महिलांनी परिसरातील अस्वच्छतेप्रश्नी नाराजी व्यक्त केली. पूर्वी या भागात नियमितपणे घंटागाडी येत होती. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून तर घंटागाडी येत नाही. कधी तरी सायंकाळी ती येते. मात्र न थांबताच निघून जाते. यामुळे परिसरात रोगराई पसरल्यास त्यास सर्वस्वी महापालिका प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. याप्रश्नी जातीने लक्ष घालून या परिसरात घंटागाडी नियमित येईल आणि कचराही उचलण्याची व्यवस्था तातडीने केली जाईल,असे आश्वासन बडगुजर यांनी महिलांना दिले.

- Advertisement -

 यावेळी प्रज्ञा दांडेकर, प्रमिला जाधव, ताराबाई सोनवणे, कुसुम कापडणीस, सुशीला आव्हाड, नंदा बिसे, कल्पना जगताप, माधुरी शिंदे,कल्याणी बिरारी, कविता बच्छाव, सुवर्णा गाडगीळ, भावना बिडवे, लता पाटील, कल्पना माळी, इंदूबाई खैरनार, दीप्ती गाजरे,अनिता बुराडे,सरला पाटील, कल्पना पाटील, अनिता सोंजय, शुभांगी गिते, अलका जाधव, शीतल शिंदे, अनिता धामणे, लांडगे मावशी, राणी जाधव यांचा समावेश होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -