घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसंशयास्पद मृत्यू कसे ठरू शकतात अकस्मात मृत्यू?

संशयास्पद मृत्यू कसे ठरू शकतात अकस्मात मृत्यू?

Subscribe

चार प्रकरणांत पोलिसांसह वैद्यकीय व्यवस्थेवर संशय, गुन्हेगारीवर पांघरून घालण्यासाठी ’उद्योग’?, व्हिसेरा मिळेना, पोलीस तपास संथगतीने सुरु

अनोखळी व्यक्तींचे मृतदेह निर्जनस्थळी आढळण्याचे प्रमाण शहरासह जिल्ह्यात वाढले आहेत. या शवविच्छेदनासाठी हे मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवले जात असले तरी शवविच्छेदनाच्या अहवालात मात्र संबंधितांचे मृत्यू बुडून झाल्याचे स्पष्ट केले जाते. या एकमेव कारणामुळे चौकशीची फाईल पोलिसांकडून बंद केली जाते; प्रत्यक्षात ज्या अवस्थेत मृतदेह आढळून येतात, ते बघता हे मृत्यू संशयास्पदच असल्याचा संशय बळावतो. तरीही हे मृत्यू अकस्मात मृत्यू दाखवून गुन्हेगारांना अभय देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे की, काय अशी शंका व्यक्त केली जात आहे.

तोंडात बोळा कोंबलेला, हात बांधलेल्या अवस्थेत मृतदेह

- Advertisement -

नाशिक-पुणे महामार्गावरील नांदूर शिंगोटे बायपास परिसरातील नाल्यात ३ ऑक्टोबर रोजी पंचवटीतील २७ वर्षीय गौरव नाईकवाडे यांचा मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे, मृत गौरवच्या   तोंडात बोळा व हात बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. मात्र, शवविच्छेदनात त्याचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे अहवालातून समोर आले. तरीही, निर्जनस्थळी मृतदेह आढळल्याने पोलीस व नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मृत गौरवच्या मोबाईलवर अनेकांचे एकाचवेळी १६ कॉल आल्याचे समोर आले आहे.

टिळकवाडीत आढळला विवस्त्रावस्थेत अनोळखी तरुणाचा मृतदेह

- Advertisement -

टिळकवाडीत बांधकाम सुरु असलेल्या एका २२ मजली इमारतीच्या तळमजल्यावर सोमवारी (दि.१६) अनोळखी तरुणाचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला असता सात दिवसांपूर्वी तरुणाचा मृत्यू झाल्याचे समोर आले. डॉक्टरांनी नैसर्गिक मृत्यू झाल्याचे कारण देत व्हिसेरा राखून ठेवला आहे. गंभीर बाब म्हणजे, घटनास्थळी तरुणाचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आणि दुसरी त्याचे कपडे आढळून आल्याने घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.

पायाला दगड बांधलेल्या स्थितीत विहिरीत आढळला युवकाचा मृतदेह

दिंडोरी पोलिसांच्या हातावर तुरी देवून पळून गेलेल्या बलात्कारप्रकरणातील उमेश खादंवेचा मृतदेह ३ ऑक्टोबर रोजी विहिरीत मृतदेह आढळून आला. शवविच्छेदनात त्य्चा बुडून मृत्यू झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला. मृताच्या पायाला दगड बांधल्याचे समोर आल्यामुळे संशय व्यक्त केला जात आहे. मृत्यूपूर्वी त्याच्यासोबत आणखी कोण होते का, याचा तपास पोलीस करत आहेत.

पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाला दगड बांधून फेकले विहिरीत

निफाड तालुक्यातील वडाळीमध्ये बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून चुलत मामेभावाने आतेभावाचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. मामेभावाने मित्रासमवेत आतेभाऊ रोशन झाल्टेच्या डोक्यावर वर्मी घाव करत ठार केले. मृतदेहाची ओळख लपवण्यासाठी मृतदेहाला दोरीने दगड बांधून पुरावा नष्ट करण्यासाठी तो मृतदेह विहिरीत फेकून दिला होता. मृतदेह मिळाल्यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. शवविच्छेदनात डोक्यास मार लागल्याने मृत्यू झाल्याचे निदान झाले. चौकशीत मामेभावासह एकाने खूनाची कबुली दिली.

Sushant Kirve
Sushant Kirvehttps://www.mymahanagar.com/author/ksushant/
गेल्या १२ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. क्राईम, आरोग्य, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लिखाण. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेण्या अपघातांमध्ये घट होण्यासाठी सातत्याने लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -