घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसराईत चोरटे जाळ्यात; 'इतके' तोळे सोन्यासह लाखोंचा मुद्देमाल जप्त

सराईत चोरटे जाळ्यात; ‘इतके’ तोळे सोन्यासह लाखोंचा मुद्देमाल जप्त

Subscribe

नाशिक : अंबड पोलिसांनी तिडके कॉलनीतील घरफोडीचा तपास करत सराईत चार चोरट्यांनी अटक केली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून ४५ तोळे सोन्यासह रोख रक्कम असा २८ लाख ५० हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या आरोपींकडून आणखीही काही घरफोड्या आणि फसवणुकीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
अक्षय उत्तम जाधव(वय २६, रा.दत्तनगर, अंबड), संदीप सुधाकर अल्हाट(वय २४, रा.कांबळेवाडी भिमनगर, सातपूर), बाबासाहेब गौतम पाईकराव(वय २८,रा.भीमनगर, सातपूर) आणि विकास प्रकाश कंकाळ(वय २१, रा.कांबळेवाडी, सातपूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिडके कॉलनीतील आनंद गोविंद रायकलाल(वय ६२, रा.वाईड अर्चिड) यांच्या घरी १६ ऑगस्ट २०२२ च्या रात्री अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करुन ३२ तोळे सोन्याचे दागिने चोरुन नेले होते.याबाबत अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा ३० सप्टेंबर २०२२ रोजी दाखल झाला होता. या चोरीचा तपास करत असताना अक्षय जाधव, संदीप अल्हाट, बाबासाहेब पाईकराव आणि विकास कंकाळ या आरोपींकडून तब्बल १६ लाख रुपये किंमतीचे विविध घरफोड्यांमध्ये चोरलेले सोन्याचे ३२ तोळे दागिने आणि सोने विकून आलेली रक्कम ६५ हजार रुपये असा मुद्देमाल जप्त केला.

- Advertisement -

अशोक चिमाजी ठाकरे(वय ४२, रा.बालाजी अपार्टमेंट, महालक्ष्मीनगर, अंबड) यांच्या मुलीचा अजाणतेपणाचा फायदा घेऊन आकाश संजय शिलावट(रा.नाशिकरोड) याने तिच्याकडून १२.५० तोळे सोन्याचे दागिने फसवून हस्तगत केले होते. याप्रकरणी आकाश शिलावट विरोधात अंबड पोलिस ठाण्यात २० सप्टेंबर २०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील ६ लाख रुपये किंमतीचे सोनेदेखील अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रमाणे एकूण ४५ तोळे सोन्यासह २८ लाख ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल अंबड पोलिसांनी जप्त केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक खतेले, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस हवालदार नेहे आणि ढेरंगे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -