घरमहाराष्ट्रनाशिकइच्छुकांनी म्हटले ‘त्यांचं ठरलंय, मुलाखती या केवळ औपचारिकता’

इच्छुकांनी म्हटले ‘त्यांचं ठरलंय, मुलाखती या केवळ औपचारिकता’

Subscribe

पक्षाच्या वतीने १४५ जणांनी दिल्या मुलाखती

भाजपमधून शहरातील तीनही मतदारसंघातून तब्बल ४५ तर उर्वरित बारा मतदारसंघात १०० पेक्षा अधिक इच्छुकांनी मुलाखती दिल्यात. महत्वाचे म्हणजे यातील बहुतांश इच्छुकांनी उमेदवारीच्या बाबतीत ‘पक्षाचं यापूर्वीच ठरलंय’ अशी प्रतिक्रिया देत मुलाखती या केवळ औपचारिकता असल्याचे त्यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीसाठी जरी या मुलाखती असल्या तरी अनेकांचा डोळा अन्य पदांकडे आहे. त्यामुळे या पदांवरील दावा पक्का करण्यासाठी मुलाखतींना हजेरी लावणार्‍यांची संख्या वाढल्याचे पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात नगरविकास राज्यमंत्री तथा नाशिक विधानसभा निरीक्षक योगेश सागर यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी सकाळपासूनच कार्यालयात इच्छुकांची गर्दी झाली होती. तत्पूर्वी कोअर कमिटीची बैठक नगरविकास राज्यमंत्री तथा नाशिक विधानसभा निरीक्षक ना.योगश सागर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. बैठकीस प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते, सुनिल बागुल, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष गिरीष पालवे, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, सरचिटणीस पवन भगुरकर, काशिनाथ शिलेदार, उत्तमराव उगले, संभाजी मोरुस्कर, आ.बाळासाहेब सानप, आ.सीमा हिरे, आ. देवयानी फरांदे, महापौर रंजना भानसी, सभागृह नेता सतीश सोनवणे, गटनेता जगदीश पाटील उपस्थित होते.

- Advertisement -

यांनी दिल्या मुलाखती

नाशिक पूर्व विधानसभा – आ.बाळासाहेब सानप, सुनील केदार, अरुण पवार, उध्दव निमसे, प.पु.स्वामी प्रा.डॉ.तुळशीराम गुट्टे, हेमंत धात्रक, उत्तम उगले, कमलेश बोडके, सुनिल आडके, दिनकर आढाव, मुकुंद आढाव, कांचन खाडे, बाळासाहेब पालवे, संभाजी मोरुस्कर, दामोदर मानकर, जगदीश गोडसे

नाशिक मध्य विधानसभा – आ.देवयानी फरांदे, लक्ष्मण सावजी, वसंत गिते, आशिष नहार, विजय साने, सुरेश पाटील, हिमगौरी आहेर-आडके, शिवाजी गांगुर्डे, गणेश कांबळे, कुणाल वाघ, सुनील खोडे

- Advertisement -

नाशिक पश्चिम विधानसभा – आ.सीमा हिरे, प्रदीप पेशकार, दिनकर पाटील, शशिकांत जाधव, कैलास आहिरे, अलका आहिरे, अनिल जाधव, सतिष सोनवणे, बाळासाहेब पाटील, प्रशांत कोतकर, विक्रम नागरे, मुकेश शहाणे, निर्मला पवार, मयुर अलई, जगन पाटील, दिलीपकुमार भामरे, छाया.

देवळाली- देवळाली : नगरसेविका सरोज अहिरे, भगवान दोंदे, रोषन घाटे, प्रतीम आढाव, कुणाल वाघ, रामदास सदाफुले, संजय गालफाडे, सुदेश बर्वे, संपत जाधव, अंबादास पगारे, शरद मोरे, कन्हैया साळवे, श्याम दोंदे, स्वप्निल धनगर, तुषार वाघमारे, शीतल विसावे.

नांदगाव: जितेंद्रसिंग़ गिल, सचिन दराडे, माजी आमदार संजय पवार, दीपक देसले, जगन्नाथ हिरे, पंकज शेवाळे, मनीषा पवार, रत्नाकर पवार, अनिल वाघ, पंकज खताळ, संजय सानप, राजेश बनकर, बापुसाहेब शिंदे.

येवला: प्रमोद सस्कर, धनंजय कुलकर्णी, बाबासाहेब डमाळे, ज्ञानेश्वर जगताप, आनंद शिंदे, नानासाहेब पाटील, लक्ष्मण साताळकर, कैलास सोनवणे

निफाड: बापुसाहेब पाटील, शंकरराव वाघ, सतिष मोरे, लक्ष्मण निकम, राजाराम शेलार, चेतन घोडके, आदिश सानप, नितिन जाधव, मयुर गावडे, भागवत बोरस्ते, गुरुदेव कांदे, वैकुंठ पाटील, दीपक श्रीखंडे, अल्पेश पारख, हेमंत बोरस्ते.

इगतपुरी : शिवराम झोले, विनायक माळेकर, पांडुरंग झोले, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, भावराव डगळे, रमेश मिसरड, हनुमंत निसरड, विष्णु आचारी, अशोक शिंदे, परशराम वाघेरे, मोतीराम देशमुख, जयराम धुमाळ, विष्णु दीपाडे, कौशल्या पालमे.

दिंडोरी: आशा कराटे, भारती जोंधळे, भास्कर गवळी, सोमनाथ चौधरी, संजय वाघ

कळवण: रमेश थोरात, जिल्हा परिषद सदस्य कलावती चव्हाण, समीर चव्हाण, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, भरत भोये, नारायण गावित, राजेंद्र ठाकरे.

सिन्नर: भाऊसाहेब कडभाणे, तानाजी जाधव, संजय अनकट, भाऊसाहेब शिंदे, सुनील केकाण, राजश्री कपोते, सविता कोंढुरकर, जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे, ज्ञानेश्वर कुर्‍ हाडे, राजेश कपुर, सुनील हांडे, किशोर देशमुख, तानाजी गायधनी, संपत काळे, सुभाष कर्पे
चांदवड-देवळा: आमदार डॉ.राहुल आहेर, जिल्हा बँक अध्यक्ष केदा आहेर, जिल्हा परिषद गटनेते डॉ.आत्माराम कुंभार्डे, भुषण कासलीवाल, प्रशांत ठाकरे, विकास भुजाडे
मालेगाव बाह्य: संजय निकम, जिल्हाध्यक्ष दादा जाधव, सुरेश निकम, समाधान हिरे, जितेंद्र सिंग गिल, संदीप पाटील, सुनील गायकवाड, दीपक पवार, रत्नाकर पवार, जिल्हा परिषद सभापती मनीषा पवार
मालेगाव मध्य: आकलाख अहमद, शेख इब्राहिम शेख अस्लम, मोहम्मद लुकमान अन्सारी, शरीब बाबा अहमद, मुजाहिद अख्तर, शेख सलिम
बागलाण: साधना गवळी, गितांजली पवार, जयश्री बर्डे, माजी आमदार दीलिप बोरसे, जयवंत पवार, दीपक ठाकरे, राकेश घोडे, मच्छिंद्रनाथ बर्डे, वाळू गावित.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -