घरमहाराष्ट्रनाशिकमहसूल कर्मचारी आजपासून संपावर

महसूल कर्मचारी आजपासून संपावर

Subscribe

चर्चा निष्फळ; कामकाज होणार ठप्प

महसूल कर्मचारयांच्या मागण्यांबाबत कोणताही तोडगा निघू न शकल्याने गुरूवार दि. ५ पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय महसूल कर्मचारी संघटनेने घेतला आहे. कर्मचारयांच्या संपामुळे महसूली कामकाज ठप्प होणार आहे.

महसूल कर्मचारी संघटनेने आपल्या मागण्यांसाठी गेल्या दोन महीन्यांपासून वेगवेगळया टप्प्यांवर आंदोलन केले. आंदोलनाच्या अखेरच्या टप्प्यात २८ ऑगस्ट रोजी एक दिवसाचे रजा आंदोलन करण्यात आले.त्यानंतर ३१ ऑगस्ट रोजी एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला. त्याचप्रमाणे कर्मचारयांनी रक्तदान करत शासनाचा निषेध नोंदवला. मात्र वारंवार आंदोलन करूनही शासनाने कर्मचारयांच्या प्रश्नांबाबत निर्णय घेतला नाही. अखेर कर्मचारयांनी ५ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला. याची दखल घेत शासनाने संघटनेच्या शिष्टमंडळास चर्चेसाठी बोलावले परंतु ही बैठक कोणत्याही निर्णयाविना निष्फळ ठरल्याने अखेर महसूल कर्मचारी संघटनेने बेमुदत संपाचे हत्यार उपसले त्यानूसार आता कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याने या संपाचा परिणाम महसुली कामकाजावर दिसून येणार आहे.

- Advertisement -

नाशिक जिल्हयातही हा संप यशस्वी करण्याचे अवाहन योगेश कोतवाल, नरेंद्र जगताप, ज्ञानेश्वर कासार, अरूण तांबे, गणेश लिलके, तुषार नागरे, रमेश मोरे, वंदना महाले, जी.एल.पवार, बी.एन.वायकंडे आदिंनी केले आहे.

या आहेत प्रमुख मागण्या

  • महसूल लिपिकाचे पदनाम बदलून महसूल सहायक करणे.
  • अव्वल कारकून वर्ग ३ या संवर्गाच्या वेतन श्रेणीमधील त्रुटी दूर करणे.
  • नायब तहसिलदारांचे सरळसेवा भरतीचे प्रमाण ३३ वरून २० टक्के करणे.
  • कर्मचारयांसाठी कॅशलेस वैद्यकिय सुविधा योजना राबविणे.
  • शासनाच्या नविन योजना राबवतांना स्वतंत्र कर्मचारी वर्ग देण्यात यावा.
  • सर्व संवर्गातील व्यपगत पदे पुर्नजिवीत करून तत्काळ भरण्यात यावीत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -