घरमहाराष्ट्रनाशिककुसुमाग्रज प्रतिष्ठानचे ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार जाहीर

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार जाहीर

Subscribe

विविध क्षेत्रातील मान्यवर पुरस्काराने सन्मानित

नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने एक वर्षाआड देण्यात येणारे विविध क्षेत्रातील ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार जाहीर झाले आहेत. प्रतिष्ठानच्या वतीने २०२२ च्या गोदावरी गौरव पुरस्कारासाठी दिग्दर्शक अतुल पेठे, शास्त्रज्ञ डॉ. हेमचंद्र प्रधान, चित्रकार डॉ. सुधीर पटवर्धन, बिबट्याशी लढा देणार्‍या सीताबाई घारे, तबलावादक पं. सुरेश तळवळकर आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना सन्मानित केले जाणार आहे, अशी मकरंद हिंगणे यांनी पत्रकार परिदेत दिली.

नाट्य, संगीत, लोकसेवा, क्रीडा-साहस, चित्र, ज्ञान या क्षेत्रातील व्यक्तींना द्यावयाच्या गोदावरी गौरव पुरस्कारासाठी गुरुवारी (दि.१०) पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विश्वस्त हेमंत टकले, प्रमुख कार्यवाह मकरंद हिंगणे, कवी प्रकाश होळकर, राजेंद्र डोखळे, ड. अजय निकम आदी उपस्थित होते.

- Advertisement -

हिंगणे म्हणाले, कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापूर्वी देण्यात येणारा गोदावरी गौरव पुरस्कार गेल्या वर्षी ऑनलाईन देण्यात आला होता. यावर्षी हा पुरस्कार समारंभ प्रतिष्ठानच्या विशाखा सभागृहात १० मार्च २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता अध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. २१ हजार रुपये रोख, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. प्रतिष्ठानच्या आजी-माजी विश्वस्थांकडून मागविलेल्या नावांचा या निवडीसाठी विचार करण्यात आला.

 

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -