घरमहाराष्ट्रनाशिकलॉकडाऊन : आपत्कालीन वैद्यकीय परिस्थिती आणि उपचार

लॉकडाऊन : आपत्कालीन वैद्यकीय परिस्थिती आणि उपचार

Subscribe

करोना व्हायरसची भीती व क्वारंटाईन ठेवण्याची गरज, यामुळे बरेच रूग्ण कोविड-19 व्यतिरिक्त इतर वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत उपचार घेण्यापासून दूर राहताहेत. याबद्दलचे वास्तव जाणून घ्या डॉक्टरांकडून...

करोना व्हायरसची भीती व क्वारंटाईन ठेवण्याची गरज, यामुळे बरेच रूग्ण कोविड-19 व्यतिरिक्त इतर वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत उपचार घेण्यापासून दूर राहताहेत. दोन महिन्यांपासून रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी कोरोना संसर्गाच्या भीतीपोटी आपत्कालीन परिस्थितीत उशीरा वैद्यकीय मदत घेतल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. बर्‍याच रुग्णांच्या मनात ही भीती आहे की, रुग्णालयात गेल्याने त्यांना कोरोनाचा संसर्ग होईल. काही क्लिनिक आणि रुग्णालये बंद असल्याने हृदयविकार, मेंदूविकार, पोटविकार आणि अपघातात हाडांना इजा झालेल्या रुग्णांनी दुखणे अंगावर काढल्याचे आपल्याला दिसत आहे. परिस्थिती अतीगंभीर झाल्यावरच ते हॉस्पिटलमध्ये जातात. अशा परिस्थितीत रुग्णालयात आल्यावर बर्‍याच वेळा आजार बळावलेला असतो आणि त्यावर उपचार करणे कठीण होते. अशावेळी कायमचे अपंगत्व किंवा दीर्घकाळ राहणारे गंभीर परिणाम होऊ शकतात.

हृदयविकार संदर्भातील आपत्कालीन परिस्थिती कोणती?

लॉकडाऊनच्या काळात सामान्य माणसांच्या खाण्या-पिण्याच्या आणि शारीरिक हालचालींच्या सवयींमध्ये फार बदल झाला आहे. याच कारणांमुळे हार्ट अटॅकचे प्रमाण वाढलेले दिसून आले आहे. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर जंतुसंसर्गाची भीती मनात बाळगत हार्ट अटॅकचे रुग्ण आपले दुखणे अंगावर काढताना आम्हाला बघावयास मिळतात आणि यामुळे मृत्यूचा धोका तर वाढतोच शिवाय पुढील आयुष्यामध्ये हृदयाचे पंपिंग कमी होणे आणि हार्ट फेल्युअरसारखे गंभीर परिणाम सुद्धा उद्भवतात. या काळात वोक्हार्ट हॉस्पिटल, नाशिक येथे सर्व हृदयविकारांवर निदान आणि उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून 81 रुग्णांवर अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरीसारखे उपचार करून त्यांना हृदयविकारांपासून मुक्त करण्यात आल्याचे येथील प्रसिद्ध हृदयविकार तज्ज्ञ डॉ. विजयसिंह पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

पक्षाघात आणि इतर मेंदूविकार संबंधित इमर्जन्सी कोणत्या?

या काळात हार्ट अटॅकप्रमाणेच पक्षाघाताच्या रुग्णसंख्येत सुद्धा वाढ होताना दिसत आहे. काही कारणास्तव मेंदूचा रक्तपुरवठा खंडित होतो. त्यामुळे तीव्र स्वरूपाची डोकेदुखी, अचानक शुद्ध हरपणे, अचानक नजर जाणे, शरीराचा तोल जाणे, चेहरा वाकडा होणे, हातापायांची ताकद जाणे, बोलताना बोबडी वळणे अशी लक्षणे दिसतात. अशावेळी प्रत्येक सेकंदाला मेंदूतील लक्षावधी पेशी मरत असतात. म्हणूनच रुग्णाला तातडीने साडेचार तासांच्या आत हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचार केले गेले तर फायदा होतो. अन्यथा रुग्णाला कायमचं अपंगत्व येतं. काही वेळा अपघातामध्ये मेंदूला इजा होते किंवा मेंदूत गाठ होते अशावेळी आपण हॉस्पिटलमध्ये तातडीने जायलाच पाहिजे. लॉकडाऊनच्या काळात मेंदूविकाराच्या 38 रुग्णांवर वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया व उपचार करण्यात आले आहे. अत्याधुनिक सीटी-स्कॅन, एमआरआय आणि इतर निदानात्मक उपकरणांसह येथे मेंदूविकारांवर शस्त्रक्रियेसाठी लागणार्‍या सर्व सुविधा उपलब्ध असल्याचे येथे मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. विशाल सावळे (पाटील) यांनी सांगितले.

हाडांचे फ्रॅक्चर आणि दुखापत झाल्यास उपचार काय?

याविषयी वोक्हार्ट हॉस्पिटलमधील अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. अजिंक्य देसले म्हणाले की, लॉकडाऊनच्या या परिस्थितीत घरातसुद्धा काही अशा अप्रिय घटना होऊन आपल्याला दुखापत होते, ज्यावर योग्य वेळेत योग्य उपचार ना घेतल्यास गंभीर विकृतींना आपल्याला सामोरे जावे लागू शकते. उदाहरणतः काही अपघात होऊन मार लागतो आणि यामुळे हाडांना दुखापत होते आणि हाडांचे फ्रॅक्चरदेखील होतात. हाड किंवा सांध्यामध्ये दुखणे, गुडघा किंवा खांदा अतिदुखणे, चालताना गुडघा किंवा खुब्यात तीव्र वेदना होणे, सांध्यांच्या हालचाली मोकळेपणे करता न येणे ही लक्षणे सहसा दिसतात. अशी लक्षणे असल्यास दुखणे अंगावर काढू नका. कारण, असे केल्याने कायमस्वरूपी व्यंग येऊ शकते व कायमस्वरूपी अधुपणा येण्याचीही शक्यता असते. आता तर सांध्यांवर दुर्बिणीद्वारेसुद्धा शस्त्रक्रिया करणे शक्य झाले आहे. लॉकडाऊनच्या काळात 10 अस्थिरोग रुग्णांवर उपचार व शस्त्रक्रिया करून त्यांना बरे केले आहे.

- Advertisement -

पचनसंस्थेशी निगडित कोणत्या इमर्जन्सी आहेत, ज्यात तत्काळ उपचार घेतले पाहिजे?

डॉ. संदीप सबनीस हे वोक्हार्ट हॉस्पिटल येथे पचनसंस्था, लिव्हर व स्वादुपिंडाचे शल्यचिकित्सा तज्ज्ञ आहेत. ते सांगतात की, अनेकदा रुग्णांना रक्ताची उलटी होते. पोटात अतिशय वेदना होतात. जेवण गिळता येत नाही. पोटात फुगवटा दिसतो. संडासावाटे रक्त पडते, अशी लक्षणे दिसतात. या लक्षणांसाठी लवकरात लवकर योग्य निदान करून उपचार घेतले पाहिजे. ही लक्षणे धोक्याची असू शकतात. पित्ताशयातील त्रासदायक खडे, मोठे किंवा सूज असलेले हर्नियाचे प्रकार आणि अ‍ॅपेंडिक्सच्या आजारांवरसुद्धा तत्काळ सल्ला घेण्याचे आवाहन ते करतात. लॉकडाऊनच्या काळात 39 रूग्णांवर शस्त्रक्रिया आणि उपचार केल्याचे त्यांनी नमूद केले.

वोक्हार्ट हॉस्पिटल, नाशिक हे उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य आरोग्यसेवा पुरवणारे आणि पहिले एन.ए.बी.एच. प्रमाणित हॉस्पिटल आहे. येथे जंतुसंसर्ग होऊ नये यासंदर्भात सर्व खबरदारी घेत रुग्णाची चाचणी केली जाते. योग्य प्रोटेक्टिव किट्स वापरून अगदी निर्जंतूक वातावरणामध्ये रुग्णांवर शस्त्रक्रिया आणि उपचार केले जातात. जागतिक आरोग्य संघटना आणि आयसीएमआर स्टँडर्ड्सचे पालन केल्याने इन्फेक्शनची रिस्क किंवा जंतुसंसर्गाचा धोका अगदी नगण्य असतो. या सर्व उपाययोजना केल्यामुळे वोक्हार्ट हॉस्पिटल येथे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाहीच्या जवळपास आहे, असे आपण म्हणू शकतो. सर्व चाचण्या आणि उपचारांची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे रुग्णाला इतरत्र कुठेही जाण्याची गरज नाही, असेही येथील केंद्रप्रमुख विनोद सावंतवाडकर यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -