घरCORONA UPDATECoronaVirus : मुंबई पोलीसाला कल्याणच्या संकुलनात प्रवेशबंदी!

CoronaVirus : मुंबई पोलीसाला कल्याणच्या संकुलनात प्रवेशबंदी!

Subscribe

कोरोना महामारीच्या दिवसात पोलीस कर्मचाऱ्यांनी सेवा करावी की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अत्यावश्यक सेवेत आपले कर्तव्य बजावत असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला राहत असणाऱ्या संकुलनात प्रवेशबंदी केल्याची घटना कल्याण येथील खडकपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील श्री कॉम्प्लेक्समध्ये घडली असून यासंदर्भात एका पोलिसाची तक्रार दाखल करून घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. कोरोना महामारीच्या दिवसात पोलीस कर्मचाऱ्यांनी सेवा करावी की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मुंबईतील धारावी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस नाईक म्हणून कार्यरत असणारे प्रवीण सूर्यवंशी कल्याणातील खडकपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील श्री कॉम्प्लेक्स येथे आपल्या परिवारासह राहत आहेत. संकुलनातील रहिवाशी असणारे इसम कोरोना आला असे सतत बोलून त्यांचे खच्चीकरण करत होते. कोरोनाचे पोलिसांना मोठ्या प्रमाणात बाधा होत असल्याने संकुलनामध्ये प्रवेश बंद केला होता. त्यांची टू व्हीलर गाडी देखील तोडफोड करण्यात आल्याने पोलीस नाईक असणाऱ्या सूर्यवंशी यांनी तडक खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन झालेला प्रकार कर्तव्यावर असणाऱ्या महिला पोलीस उपनिरीक्षक योगिता कोकाटे यांच्या कानावर घातला. मात्र, आपली तक्रार त्यांनी घेतली नसल्याचे त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

- Advertisement -

यासंदर्भात धारावी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणारे पोलीस नाईक प्रवीण सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता तर मला संकुलनामध्ये येण्यास मज्जाव करून कोरोना आला असे बोलून माझे खच्चीकरण केल्याचे त्यांनी सांगून माझी मोटरसायकल देखील तोडफोड केल्याचे सांगितले. याबाबत मी खडकपाडा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेलो असता माझी तक्रार देखील पोलिसांनी घेतली नसल्याने रात्री उशिरा याबाबत सोशल मीडियावर अन्याय होत असल्याची पोस्ट व्हायरल केली आहे. मात्र काल रात्री उशिरा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी माझ्या संकुलनामध्ये येऊन त्या इसमाची समजूत घातली असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -