घरमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रLok Sabha 2024 : महाविकास आघाडीचा सांगलीचा तिढा मिटणार; राऊत म्हणाले, विशाल...

Lok Sabha 2024 : महाविकास आघाडीचा सांगलीचा तिढा मिटणार; राऊत म्हणाले, विशाल पाटील आमचे…

Subscribe

सांगली – महाविकास आघाडीचा सांगली लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज (19 एप्रिल) काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. यावेळी सांगली लोकसभेच्या जागेसंबंधी चर्चा करण्यात आली. ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

सांगलीच्या जागेवरुन महाविकास आघाडीत विशेषतः काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यात आल्या. मात्र आज संजय राऊत यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत यांची भेट घेतली आणि आगामी रणनीतीबद्दल चर्चा केली.

- Advertisement -

काँग्रेस आमदार डॉ. विश्वजित कदम हे विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. विशाल पाटील यांनी नुकतेच जिल्ह्यात शक्ती प्रदर्शन केले. मात्र आज सांगलीत आलेले संजय राऊत यांनी विशाल पाटील हे आमच्या कुटुंबातील असल्याचे सांगत वाद शमवण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी आज अर्ज दाखल केला. यावेळी मारुती चौकामध्ये जाहीर सभा घेऊन शिवसेना ठाकरे गटाने शक्तीप्रदर्शन केले. त्याआधी शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांमध्ये मनोमिलन करण्याचा प्रयत्न संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला.

14 जणांकडून 15 अर्ज दाखल

सांगली लोकसभा निवडणुकीत चौथ्या दिवशी नऊ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. नऊ जणांनी 11 अर्ज दाखल केले. आतापर्यंत 14 उमेदवारांनी 15 अर्ज दाखल केले आहेत. शनिवारी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे.

- Advertisement -

खासदार संजय पाटलांचे दोन अर्ज

भारतीय जनता पक्षाचे उमेदवार खासदार संजय पाटील यांनी दोन अर्ज दाखल केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश यशवंत खराडे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.
त्यासोबतच पांडुरंग रावसाहेब भोसले यांनी भारतीय जवान किसान पार्टीतर्फे अर्ज दाखल केला आहे. बळीराजा पार्टीतर्फे आनंदा शंकर नालगे, एआयएमआयएमकडून सुवर्णा सुधाकर गायकवाड, जनता दल सक्यूलरकडून डॉ. आकाश नंदकुमार व्हटकर, याशिवाय अजित धनाजी खंदारे, नानासाहेब बंडगर, रवींद्र सोलनकर यांनी सांगली जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याकडे अर्ज दाखल केले आहेत.

हेही वाचा : Ajit Pawar : अजित पवारांचा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल; दादांनी का आणि कोणत्या मतदारसंघातून भरला अर्ज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -