घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिकमध्ये महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद

नाशिकमध्ये महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद

Subscribe

उत्तरप्रदेशातील लखीमपूर खीरी येथे आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांना गाडी खाली चिरडण्यात आल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आणि शेतकरी आंदोलनाला समर्थन म्हणून राज्यात आज महाविकास आघाडी सरकारने राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. या बंदला नाशिक शहरासह जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

नाशिक शहरामध्ये शालिमार परिसरात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आवाहन फेरी काढत मोदी सरकारचा निषेध केला. यावेळी उपस्थितांनी मोदी सरकारचा निषेध केला. शेतकर्‍यांची हत्या करणार्‍या मोदी सरकारचा निषेध असो, अशी घोषणा दिली. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी शहरात प्रमुख बाजारपेठेसह एमजी रोड, शालिमार, सीबीएस परिसरात आवाहन फेरी काढत व्यापार्‍यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.

- Advertisement -

बंद आवाहन फेरीमध्ये राष्ट्रवादीचे गजानन शेलार, जिल्हाध्यक्ष रवींद्र पवार, काँग्रेसचे शरद आहेर, शिवसेनेचे सुनील बागुल, अजय बोरस्ते, विजय करंजकर सहभागी झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -