Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक लाल मातीचे बाप्पा यंदा ‘हल्दी गणेश’ रुपात

लाल मातीचे बाप्पा यंदा ‘हल्दी गणेश’ रुपात

मनोवेध सृष्टी गणेशाचा अभिनव उपक्रम

Related Story

- Advertisement -

शाडू माती पर्यावरण पूरक आहे का अशी शंका जेव्हा उपस्थित केली गेली तेव्हा मनोवेध फाऊंडेशनने सृष्टी गणेश उपक्रमाच्या माध्यमातून चक्क लाल आणि काळ्या मातीच्या गणपती मूर्ती बनवल्या. या गणेशमूर्ती विसर्जित केल्यानंतर त्यातून परसबागेसाठीची फुलझाडे अंकुरतात. त्यामुळे गणेशभक्तांच्या पसंतीस ही मूर्ती उतरली. पण दरवर्षी लाल आणि काळ्या मातीच्या रंगातील रुप बघूनही बच्चे कंपनी कंटाळली होती. त्यावर यंदा पर्याय शोधून काढत हल्दी गणेशची संकल्पना राबवण्यात आली आहे.

हळद, कुंकू, मुलतानी मातीच्या या मुर्तींचा हळदीसारखाच सुवास येतो.त्यासाठी शहरातील अमोल कुलकर्णी, प्रशांत बेलगावकर, वृषाली कुलकर्णी या तिघांनी मनोवेध ‘सृष्टी गणेश’या नावाच्या माध्यमातून ही संकल्पना पुढे आणली आहे. संस्थेच्या वतीने यंदा सहा हजार मूर्ती तयार करण्यात आल्या असून त्या महाराष्ट्राबाहेर इंदूरपर्यंत जाऊन पोहचल्या आहेत. अंकुर गणपती ही संकल्पना म्हणजे, काळ्या किंवा लाल अशा कोणत्याही सुपिक मातीचा वापर करत हे गणपती तयार करुन त्यात फळ फुलझाडांची बियाणे टाकली जातात. या गणपतींच्या विसर्जनासाठी घरच्याघरी कुंडीत ही मूर्ती ठेवावी.

- Advertisement -

त्यावर पाणी टाकल्यास अवघ्या तीन ते पाच दिवसांमध्ये या मातीतून अंकुर बाहेर पडतात. विसर्जनाची ही पद्धत पर्यावरणालादेखील हानिकारक नाही. गेल्या वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याचे काम सृष्टी गणेशच्या माध्यमातून केले जात आहे. तर, १७ वर्षांपासून शाळा-महाविद्यालयांमध्ये हे तिघे विद्यार्थ्यांचे प्रबोधनही करत आहेत. मात्र, ज्या प्रमाणात नागरिक पर्यावरणपूरक मूर्ती वापरण्यासाठी पुढाकार घेत आहेत, त्या प्रमाणात त्यांना तसे पर्यायदेखील उपलब्ध हवे, या उद्देशाने ही संकल्पना पुढे आणण्यात आली आहे.ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी सुनीता जानोरकर, अर्चना गुंजाळ, दीपक दिघे, शुभम चव्हाण, अनुप विश्वकर्मा, अनन्या कुलकर्णी, श्लोक कुलकर्णी, स्वरा कुलकर्णी, वेद मुळाणे ही मंडळी कार्यरत आहेत. मुले अगदी मोठ्या इतके काम करत आहेत.

गणेशोत्सवादरम्यान शाडूमातीच्या गणेशमूर्ती बाजारात उपलब्ध होत असल्या तरीही, अनेकदा त्यावरील रंग मात्र जलप्रदूषणाला कारणीभूत असे रासायनिक दिसून येतात. अशा मूर्तींना ‘अंकुर गणेश’ पर्याय ठरणार आहेत.

पर्यावरणासाठीचा हा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शाडूच्या मातीच्या मूर्तींबाबतचा गैरसमज दूर करावा लागला. त्यासाठी आम्ही मूर्ती विक्रीस्थळी जनजागृतीपर प्रदर्शनही भरवले आहे. अंकुर गणेश’निर्मितीचा प्रयोग केला. यंदा त्यालाही प्रतिसाद मिळत आहे. ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर आम्ही काम करत आहोत. त्यात यंदा आम्ही हल्दी गणेश आणल्याने गणेश भक्तांच्या तो पसंतीस उतरत आहे.- अमोल कुलकर्णी, संचालक, मनोवेध फाऊंडेशन

- Advertisement -