Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र सीबीआयच्या अहवालात छेडछाड करण्यासाठी iPhone 12 Pro ची लाच, देशमुखांच्या अडचणी वाढणार

सीबीआयच्या अहवालात छेडछाड करण्यासाठी iPhone 12 Pro ची लाच, देशमुखांच्या अडचणी वाढणार

Related Story

- Advertisement -

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh Case) यांना सीबीआयने क्लीनचीट दिल्याचा अहवाल लिक झाला होता. अनिल देशमुख यांनीच या अहवालात छेडछाड करुन लिक केला, असा दावा करण्यात आला आहे. या अहवालात छेडछाड करुन लिक करण्यासाठी सीबीआयच्या अधिकाऱ्याला आयफोन १२ प्रोची लाच देण्यात आली, असं सीबीआयने एफआयआरमध्ये म्हटलं आहे. यामुळे आता अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढणार आहेत.

अनिल देशमुख यांना सीबीआयने क्लीनचीट दिल्याचा अहवाल २९ ऑगस्टला समोर आला होता. १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात अनिल देशमुखांच्या विरोधात कोणताही सबळ पुरावा नाही. तसेच सचिन वाझेंना पुन्हा नोकरीमध्ये घेण्याच्या प्रकरणातही अनिल देशमुखांनी कोणताही हस्तक्षेप केल्याचं समोर येत नाही, असं या अहवालात म्हटलं होतं.

- Advertisement -

या संपूर्ण प्रकरणानंतर सीबीआयने अंतर्गत चौकशी समिती नेमली. या समितीने तपास केल्यानंतर सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांनीच हा अहवाल लीक केल्याचं समोर आलं. अनिल देशमुखांचे वकील आनंद डागा यांनी तिवारी यांना आयफोन १२ प्रो गिफ्ट दिल्याचं तपासात उघडकीस आलं. त्यानंतर आनंद डागा आणि अभिषेक तिवारी या दोघांनाही सीबीआयने ताब्यात घेतलं.

तिवारी आणि आनंद डागा यांना दोन दिवसांची CBI कोठडी

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणी सीबीआय तपासाच्या प्राथमिक अहवालात छेडछाड केल्याप्रकरणी पोलीस अधिकारी अभिषेक तिवारी आणि देशमुख यांचे वकील आनंद डागा (Anil Deshmukh’s lawyer Anand Daga) यांना दोन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. सीबीआयने यांना गुरुवारी सत्र न्यायालयात हजर केलं होतं. दरम्यान, या दोघांनाही दिल्लीला घेऊन जाणार आहेत.


- Advertisement -

हेही वाचा – Anil Deshmukh Case: अहवालात छेडछाड केल्याप्रकरणी तिवारी आणि आनंद डागा यांना दोन दिवसांची CBI कोठडी


 

- Advertisement -