घरमहाराष्ट्रनाशिकबिंगो रोलेट जुगारचा मास्टरमाईंड कैलास शहा गजाआड

बिंगो रोलेट जुगारचा मास्टरमाईंड कैलास शहा गजाआड

Subscribe

नाशिक ग्रामीण पोलिसांची कामगिरी

नाशिक : जिल्हयातील बिंगो रौलेट जुगार या अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन होण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री.सचिन पाटील यांनी सर्व प्रयत्न केले व त्यांचे आदेशान्वये सत्वर कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार पिंपळगाव शहरात बिंगो रौलेट जुगाराचे नावाखाली तरूणांची लाखोंची आर्थिक फसवणुक करणा-या कैलास शहा याचेविरूध्द पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यास अटक करण्यात आली आहे.

बिंगो रोलेट जुगार खेळविणारा आरोपी कैलास शहा याचेविरुध्द नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांचे
मार्गदर्शनाखाली यापुर्वीही कारवाई करण्यात आलेली आहे. नाशिक जिल्हयातील पिंपळगाव बसवंत पोलीस ठाणे हद्दीत वावी ठुशी, ता.निफाड येथील फिर्यादी रामराव बबन रसाळ यांना आरोपी नामे कैलास जोगेंद्रप्रसाद शहा व प्रितम राजेंद्र गोसावी, यांनी संगनमत करून यातील फिर्यादीचा विश्वास संपादन करून व आरोपींनी फिर्यादीचे मोबाईल कमांकावर बिंगो रौलेट फनगेम नावाचे अॅप्लिकेशन ची लिंक सेंड करून ती डाऊनलोड करून देवुन ऑनलाईन बिंगो रौलेट
जुगार खेळण्यासाठी लागणारा मेन आय.डी. व पासवर्ड पाठवुन ०१ पॉईटला ३६ रूपये या दराने पैसे मिळतील असे सागुन
फिर्यादीस आरोपींनी स्वतःचा आर्थिक फायदा होणे करीता बिंगो रौलेट जुगार खेळण्यास भाग पाडुन व अमिषाला बळी
पाडून फिर्यादीची एकुण 45,44,315/- रूपयेची आर्थिक फसवणुक केली म्हणुन पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात
भादवि कलम ४२०,४०९, १२०(ब),३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

सदर गुन्हयात आरोपी कैलास जोगेंद्रप्रसाद शहा यास अटक करण्यात आली असुन मा.न्यायालयाने 03 दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सचिन पाटील यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याचे सपोनि श्री.सपकाळे हे वरील गुन्हयाचा पुढील तपास करीत आहे.

बिंगो रौलेट जुगार हे तरूणांना लाखोंचा गंडा घालुन आर्थिक फसवणुकीचे साधन बनलेले आहे. ऑनलाईन बिंगो रौलेट जुगारामुळे झालेल्या फसवणुकीतुन तरूणांचे आणि विद्यार्थी यांचे मोठे आर्थिक व कौटूंबिक नुकसान होत असुन आत्महत्याही होत आहे, तसेच काही तरूण जिंकण्याच्या अमिषानं कर्जबाजारी होत असुन जिल्हयातील ज्या तरूण वर्गाची हया ऑनलाईन बिंगो रौलेट जुगारात आर्थिक फसवणुक झाली आहे व ज्यांना यामुळे आपली घरे, दुकानं, मोटर वाहने, स्थिर-स्थावर मालमत्ता विक्री करावी लागली आहे, अशा जास्तीत जास्त तरूणांनी नजीकचे पोलीस ठाण्यांमध्ये तकार देणे बाबतचे आवाहन नाशिक ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले आहे. तसेच आर्थिक फसवणुकीस प्रतिबंध होण्यासाठी ज्या तरूण वर्गाची फसवणुक झाली आहे, त्यांनी नजीकचे पोलीस ठाण्यांमध्ये तकार द्यावी असे आवाहन ग्रामीण पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -