घरताज्या घडामोडीबाईक रॅली’व्दारे महिला सबलीकरणाचा संदेश

बाईक रॅली’व्दारे महिला सबलीकरणाचा संदेश

Subscribe

नयनरम्य सकाळ, महिलांनी आवर्जुन परिधान केलेले रंगसंगतीचे पेहराव, डोक्यावर फेटा, स्त्री शक्तीच्या घोषणांनी दुमदुमलेला परिसर या सार्‍यांमुळे वातावरण भारावून गेले होते. महिलांनी विविध आकर्षक वेशभूषा करत, वाहतुकीचे नियम, प्लॅस्टिक बंदी, स्वच्छता, स्त्री आरोग्य, झाडे लावा झाडे जगवा, मुली वाचवा, मुली शिकवा, महिला सक्षमीकरण या विषयी संदेश देत जनजागृती केली. निमित्त होते, नो हॉर्न थीम आधारित करण्यात आलेल्या महिला बाईक रॅली’चे.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत वॉव फाउंडेशनच्या वतीने महिला बाईक रॅलीचे शनिवारी (दि.७) आयोजन करण्यात आले होते. प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील व पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी झेंडा दाखवताच ठक्कर डोम येथून रॅलीला प्रारंभ झाला. करोना आजाराच्या पार्श्वभूमीवर आयोजकांनी सर्वोतोपरी खबरदारी घेतली होती. टप्प्या-टप्प्याने बाईकस्वार महिलांना सोडले जात होते. एबीबी सर्कल, भोसला मिलिटरी स्कूल, जेहान सर्कल, गंगापूर रोडमार्गे जुना गंगापूरनाका, कॅनडा कॉर्नर, कॉलेज रोड, एबीबी सर्कल, ठक्कर डोम या मार्गे रॅली गेली. रॅलीत सायकलिस्ट, टू-व्हिलर, इलेक्ट्रिकल गाडी व बाईकस सहभागी झाल्या होत्या. सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, पहिल्या महिला डॉक्टर, पहिल्या नौदलाच्या महिला अधिकारी आदींचे रुपे महिलांनी साकारली होती. ठक्कर डोम येथे रॅलीचा समारोप झाला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, ज्योती ठक्कर, रेखा देवरे, अश्विनी न्याहारकर आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -