घरमहाराष्ट्रनाशिकनिंबोळा येथे आमदार आहेर यांनी केली मका नुकसानीची पाहणी

निंबोळा येथे आमदार आहेर यांनी केली मका नुकसानीची पाहणी

Subscribe

आढावा घेऊन माहिती देण्याचे आदेश

देवळा : चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल दौलत आहेर यांनी निंबोळा गावातील शेतकऱ्यांच्या मका पिकाच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली.
तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी, मका बियाणे सिंजेटा कंपनीचे जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी, राहुरी कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ यांच्याशी यावेळी चर्चा करून प्रत्यक्ष नुकसानीचे कारण व शेतकऱ्याचे झालेल्या पिकाची नुकसान भरपाई जास्तीत जास्त मिळवून देण्यासाठी बियाणे कंपनी व शासन स्तरावर मार्ग काढण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्याशी फोनवर संपर्क साधला व तालुका कृषी अधिकारी सचिन देवरे यांना संपूर्ण तालुक्यातील सिंजेटा कंपनीचे मका बियाणे पिकाचा नुकसानीचा आढावा घेऊन माहिती देण्याचे आदेश देण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये या संकटामधून बाहेर निघू व नुकसान भरपाई मिळेल यामुळे समाधान व्यक्त करण्यात आले.
याप्रसंगी निंबोळा गावाचे लोकनियुक्त सरपंच प्रदीप सुधाकर निकम, माजी सरपंच रमेश रामचंद्र सावंत, अरुण सावंत, ग्रामपंचायत सदस्य गोरख देवरे, सोसायटीचे संचालक सुभाष निकम, वसंत निकम, सचिन निकम, सुनील निकम, गोरख सावंत, भाऊसाहेब देवरे यांसह सर्व नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
Saiprasad Patil
Saiprasad Patilhttps://www.mymahanagar.com/author/sppatil/
गेल्या १३ वर्षांपासून नाशिकमध्ये पत्रकारितेचा अनुभव. सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, गुन्हेगारी यासह विविध विषयांवर लिखाण. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक स्तरावरील घडामोडींवर लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -