घरमहाराष्ट्रनाशिकपालिका भूसंपादन प्रकरणी पथक दाखल, झाडाझडती सुरू

पालिका भूसंपादन प्रकरणी पथक दाखल, झाडाझडती सुरू

Subscribe

भुजबळ यांनी याबाबत संशय व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिले होते चौकशीचे आदेश

नाशिक : नाशिक महानगर पालिकेने मागच्या दोन वर्षात केलेल्या ६५ भूसंपादनाची चौकशी शासनाच्या नगररचना संचालकांकडून केली जात आहे. मनपा प्रशासनाची आढावा बैठकीत पालकमंत्री भुजबळ यांनी याबाबत संशय व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी भूसंपादनाच्या चौकशीचे आदेश दिले होते.

पुणे येथील नगररचना संचालकांकडून या संशयास्पद ८०० कोटींच्या भूसंपादनाची चौकशी केली जात आहे. त्यासंदर्भात मनपा प्रशासनाने ६५ भूसंपदनाच्या ९१ फाईल्स याआधीच रवाना केल्या होत्या, त्यावर आठवड्याभरात अहवाल येणे अपेक्षित आहे. आज (दि.१०) सकाळी चौकशी समितीचे पथक नाशिक मध्ये दाखल झाले असून नाशिकरोड येथील नगररचना विभागात फाईल्सची झाडाझडती केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -