घरमुंबईलिलावती रुग्णालयाविरोधात शिवसेनेची पोलिस तक्रार

लिलावती रुग्णालयाविरोधात शिवसेनेची पोलिस तक्रार

Subscribe

नवनीत राणांच्या MRI वरून शिवसेने आज लिलावती रुग्णालयाविरोधात पोलिस तक्रार दाखल केली आहे. महापौर किशोर पेडणेकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने तक्रार दाखल केली. यावेळी MRI सारख्या कक्षात रुग्णाच्या नातेवाईकांना किंवा कुणालाही मोबाइल किंवा इतर धातूच्या वस्तूच्या घेऊन जाण्याची परवानगी नसते. मग नवनीत राणांचा MRI सुरु असताना फोटो कसे काढले, हा मुख्य आक्षेप त्यांनी घेतला आहे.

यावेळी MRI सारख्या कक्षात रुग्णाच्या नातेवाईकांना किंवा कुणालाही मोबाइल किंवा इतर धातूच्या वस्तूच्या घेऊन जाण्याची परवानगी नसते. मग नवनीत राणा यांचे फोटोसेशन झालेच कसे? असा प्रश्न मनीषा कायंदेंनी उपस्थित केला आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेजमध्येही या कक्षाबाहेर दोन मशीनगन धारी व्यक्ती असल्याचे दिसून आल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे एकूणच लिलावती रुग्णालय प्रशासनची नवनीत राणा केससंदर्भातील भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप त्यानी केला आहे.

- Advertisement -

मेडिकल कौंसिलकडे तक्रार –

दरम्यान लिलवाती रुग्णालयाविरोधात पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर शिवसेनेचे हे शिष्टमंडळ इंडियन मेडिकल कौंसिलकडे करणार असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले आहे. त्यामुळे या संस्थेमार्फतही लिलावतीवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण –

नवनीत राणा यांचे एमआरआय सुरु असताना त्यांनी मान वर करून पाहिल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. स्पाँडिलेसिसच्या रुग्णाला अशा प्रकारे मान वर करून पाहता येत नाही, मग नवनीत राणा यांची ही ड्रामेबाजी सुरु होती का? असा प्रश्न शिवसेनेने केला आहे. तसेच नवनीत राणा यांचे मान आणि पोटाच्या दुखण्यासंदर्भात दोन एमआरआय केल्याचे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले. त्याचा रिपोर्ट अद्याप का आला नाही, असा सवालही शिवसेनेने केला आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -