घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमविप्र निवडणूक कर्मचारी नॉन मराठाच

मविप्र निवडणूक कर्मचारी नॉन मराठाच

Subscribe

अ‍ॅड. ठाकरेंचे निवडणूक मंडळ अध्यक्षांना निवेदन

नाशिक : मराठा विद्याप्रसारक संस्थेकडे अनेक वेळा नवीन सभासदांची यादी व विविध शाखांचा ऑडिट रिपोर्ट मागितला असता तो जाणीवपूर्वक देण्यात आला नसल्याची तक्रार परिवर्तन पॅनलचे अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी निवडणूक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. भास्करराव चौरे यांच्याकडे केली आहे. गेल्या निवडणुकीवेळी झालेल्या संशयास्पद हालचाली पाहता निवडणूक प्रक्रिया पारदर्शी होण्यासाठी निवडणूक अधिकारी, केंद्रप्रमुख व इतर कर्मचारी हे ‘नॉन मराठा’च असावेत अशीही मागणी त्यांनी निवेदनातून केली.

निवडणुकीत संस्थेच्या घटनेची व भारतीय राज्यघटनेची पायमल्ली करुन विद्यमान कार्यकारी मंडळास उपयुक्त अशी निवडणूक नियमावली करण्याचे बेकायदेशीर प्रयत्न कार्यकारी मंडळाने केले आहेत. २०१७ च्या निवडणुकीत संस्थेच्या कार्यकारिणीच्या मर्जीतील कर्मचारी वर्ग निवडणुकीकरीता वापरला होता. संस्थेच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये मर्जीतील कर्मचार्‍यांकडून मतपत्रिका छापण्यात आल्या. त्यावेळी डुप्लिकेट मतपत्रिका छापून कर्मचारी वर्गाकडून मोठ्या प्रमाणात गैरकारभार करुन मतमोजणीमध्ये गोंधळ करण्यात आला. संस्थेने नेमलेल्या त्यांच्या मर्जीतील निवडणूक मंडळाने पक्षपातीपणा करुन संपूर्णपणे निवडणूक प्रक्रिया बेकायदेशीरपणे राबवली होती. म्हणून ऑगस्ट २०२२ मध्ये होणार्‍या निवडणुकीत अशाच प्रकारचा गोंधळ घालण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे काही अघटीत घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठाकरेंनी केल्या या मागण्या

  • मविप्र संस्थेची निवडणूक प्रक्रिया आपल्या निगराणीखाली राबवावी
  • मतमोजणी कक्षात व कक्षाबाहेर मुबलक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे निर्देश द्यावेत
  • संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया पारदर्शकपणे मतमोजणी कक्षाबाहेर मोठ्या स्क्रीनवर सभासदांना दिसण्याची व्यवस्था करण्यात यावी
  • मतमोजणीच्या ठिकाणी व बाहेर मुबलक प्रमाणात पोलीस बंदोबस्त असावा
  • मतपत्रिका या संस्तेच्या प्रिंटींग प्रेसमध्ये तयार करण्यात येऊ नये
  • त्या त्रयस्थ प्रिंटींग प्रेसकडून छापण्यात याव्यात
  • मतपत्रिकांना बारकोड देण्यात यावा
  • संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे निरीक्षण करण्यासाठी त्रयस्थ निरीक्षक नेमण्यात यावे
  • मतमोजणीच्या ठिकाणी कोणत्याही अनधिकृत व्यक्तींना प्रवेश नको
  • गेल्या मतमोजणीच्या काळात अचानक वीज गेल्याने मजमोजणी प्रक्रियेत व्यत्यय आला होता
  • अंधाराचा गैरफायदा घेण्यात आल्याचा संशय आहे. त्यामुळे मतमोजणी काळात जनरेटर व यूपीएसची व्यवस्था असावी
  • बाहेरील अनधिकृत व्यक्तींना खाद्यपदार्थ व इतर साहित्य मतमोजणी ठिकाणी आतमध्ये ये-जा होऊ नये म्हणून येताना व जाताना त्यांची पोलीस यंत्रणेमार्फत उमेदवार प्रतिनिधीसमक्ष तपासणी करावी
  • मतपेटी व मतमोजणी कक्ष उमेदवारांच्या प्रतिनिधी संमतीशिवाय सील लावू व काढू नये
  • मतपेटी ज्या ठिकाणी २८ ऑगस्टला रात्री ठेवल्या जातील तेथे प्रत्येक उमेदवारांच्या अधिकाधिक पाच प्रतिनिधींना राहण्याची व्यवस्था करावी
  • प्रत्येक उमेदवाराचे समान प्रतिनिधी मतमोजणी कक्षात सोडावेत
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -