घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमविप्रच्या मतमोजणीला प्रत्यक्षात सुरुवात; एकाचवेळी जाहीर होणार निकाल

मविप्रच्या मतमोजणीला प्रत्यक्षात सुरुवात; एकाचवेळी जाहीर होणार निकाल

Subscribe

एकाचवेळी सर्व उमेदवारांचा निकाल हाती येतील

जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या मविप्र समाज शिक्षण संस्थेच्या मतमोजणीला दुपारी ४ वाजता सुरुवात झाली. कर्मचाऱ्यांच्या लंच ब्रेकनंतर लगेचच मतमोजणी सुरू झाली आहे. प्रत्येक उमेदवाराच्या मतमोजणीसाठी एक टेबल याप्रमाणे २४ टेबलवर मतमोजणी एकाचवेळी सुरु झाली आहे. त्यामुळे एकाचवेळी सर्व उमेदवारांचा निकाल हाती येतील. अर्थात पहिल्या – दुसऱ्या फेरीनंतर उमेदवारनिहाय कल समजायला सुरुवात होईल.

आज (दी.२९) सकाळी ८ वाजता मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. संस्थेच्या मुख्यालय कॅम्पस परिसरातील मराठा हायस्कूलच्या बाजूला असलेल्या कै. तुकाराम रौदळ सभागृहात ही मतमोजणी पार पडत आहे. सुरवातीला पदाधिकारी जागांसाठीच्या मतपेट्या उघडण्यात आल्या आहेत. त्यातून २ फेर्‍याच्या मतपत्रिका बाहेर काढून प्रक्रियेस सुरवात करण्यात आली आहे. या मतपत्रिकानची रंगानुसार विभागणी करून मंतमोजणीला सुरवात झाली. खरे कल दुपारी १ वाजेच्या जेवणाच्या सुट्टीनंतरच समोर यायला सुरवात होणे अपेक्षीत होते. परंतु प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांच्या लंच ब्रेकनंतर म्हणजे दुपारी ४ वाजता मतमोजणी सुरू झाली. . दरम्यान, सेवक संचालकांच्या ३ तसेच, पदाधिकारी व संचालक अश्या एकूण २४ जागांवर ही मतदान पार पडले. संचालक मंडळासाठी एकूण ९ हजार ६७७ म्हणजेच ९४.६४ टक्के मतदान झाले तर सेवक संचालकांच्या ३ जागांसाठी ४०९ इतके मतदान झाले.

- Advertisement -

सेवकांचे निकाल तासाभरात

सेवकांच्या ३ जागांसाठी सेवक विरुद्ध समर्थ या दोन पॅनल मध्ये थेट सामना होत आहे. रविवारी पडलेल्या मतदानात एकूण ४०९ सेवकांनी मतदान केल आहे. सेवक मतदारांचा आकडा संभासदांच्या तुलनेने फारच कमी आहे. त्यामुळे सेवक संचालकांच्या जागेसाठीची मतमोजणी अवघ्या तासाभरात पूर्ण होईल.

- Advertisement -

 

 

 

 

मविप्रच्या मतमोजणीला प्रत्यक्षात सुरुवात; एकाचवेळी जाहीर होणार निकाल
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -