घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकमध्ये शिवजयंतीसाठी होर्डिंग्जला परवानगी, डीजेला मात्र बंदी

नाशिकमध्ये शिवजयंतीसाठी होर्डिंग्जला परवानगी, डीजेला मात्र बंदी

Subscribe

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती एकीकरण समितीच्या बैठकीत पोलीस आयुक्तांची भूमिका

नाशिक – शहरात शिवजयंतीनिमित्त लावले जाणारे होर्डिंग्ज २० फेब्रुवारीला दिसायला नको, अन्यथा कारवाई होईल. डीजेलाही परवानगी दिली जाणार नाही, अशा शब्दांत पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी शिवजयंती आयोजकांना तंबी दिली. पोलीस आयुक्तांच्या या भूमिकेमुळे शिवजयंती एकीकरण समिती शिवप्रेमींमध्ये नाराजी पसरली.

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयात शिवजयंती एकीकरण समितीची सोमवारी (दि.१४) बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात पंचवटी, सिडको, सातपूर, नाशिकरोड अशा सर्व विभागांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष उपस्थित होते. होर्डिंग्जसह व्यासपीठ उभारण्याला परवानगी देण्याची विनंती पदाधिकाऱ्यांनी केली होती. ही मागणी काहीअंशी मान्य करत पोलीस आयुक्तांनी शिवजयंतीव्यतिरिक्त अन्य दिवशी कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यासाठी स्वतंत्र परवानगी घ्यावी लागेल, असेही सांगितले. याशिवाय संस्था नोंदणीकृत असणे बंधनकारक असल्याचेही पोलीस आयुक्तांनी सांगितले. पोलीस आयुक्तांच्या या भूमिकेमुळे शिवप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे. या बैठकीला जेलरोडचे किशोर जाचक, पंचवटीचे मामा राजवाडे, मध्य नाशिकचे नितीन शेटे-पाटील, सिडकोचे राम पाटील, कॉलेजरोडचे सुरेश पाटील, आडगावचे संदीप लभडे, नांदुर-मानूरचे समाधान माळोदे, देवळाली कॅम्पचे प्रमोद मोजाड, तर, सातपूर शिवजयंती एकीकरण समितीचे अध्यक्ष संजय राऊत उपस्थित होते. या बैठकीचे समन्वयक म्हणून किशोर बेलसरे यांनी सूत्र सांभाळली.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -