घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक महापालिका बसवणार 36 लाखांची लिक्वीड ऑक्सिजन टँक

नाशिक महापालिका बसवणार 36 लाखांची लिक्वीड ऑक्सिजन टँक

Subscribe

स्थायीच्या बैठकीत निविदा मंजूर, आरोग्य यंत्रणेची उदासीनता चव्हाट्यावर

कोविड काळात आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभाराची लक्तरे पुन्हा पालिका स्थायी समिती बैठकीत काढण्यात आली. आरोग्य यंत्रणेच्या उदासीनतेनं आता रुग्णांमध्ये आजार लपवण्याची मानसिकता वाढत चालल्याचा दावाही सदस्यांनी केला.

डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटल, डॉ. वसंतराव पवार मेडीकल कॉलेज आणि नाशिकरोड येथील नवीन हॉस्पिटलच्या इमारतीत लिक्वीड ऑक्सिजन टँक बसवण्याच्या निविदेस मंजूरी देण्यात आली. या कामासाठी सुमारे ३६ लाख खर्च येणार आहे. या कामामुळे ऑक्सिजनच्या तुटवड्याचा प्रश्न बर्‍यापैकी कमी होणार आहे. नाशिकरोड रुग्णालयात लवकरच ३०० बेड्स वाढवले जातील. तर, मुलतानपुरा इथं लवकरच हॉस्पिटल सुरु केलं जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक बापुसाहेब नागरगोजे यांनी दिली. १५ बेडसपेक्षा कमी क्षमतेच्या हॉस्पिटल्सला कोविड सेंटरची परवानगी दिली जात नसल्याचा खुलासाही त्यांनी केला. दरम्यान, खासगी हॉस्पिटलचे ऑडिट प्रामाणिकपणे करावे. तसेच, महापालिकेच्या हॉस्पिटल्समध्ये अधिकाधिक सुविधा पुरवाव्यात, असे आदेश सभापती गणेश गिते यांनी दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -