घरताज्या घडामोडीपोलीस आयुक्तालयात पारंपारिक पद्धतीने शस्त्रपूजन

पोलीस आयुक्तालयात पारंपारिक पद्धतीने शस्त्रपूजन

Subscribe

विजयादशमीनिमित्त नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील शस्त्रास्त्रांची पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या हस्ते सोमवारी (दि.२६) पारंपारिक पद्धतीने करण्यात आले. शस्त्र पूजनात एके 47, रायफल, पिस्टल, काडतुसे, एअर गन, जिलेटीन यांसह पोलीस दलातील इतर शस्त्रांचा समावेश होता. यावेळी पोलीस आयुक्तांनी उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना विजयादशमीनिमित्त शुभेच्छा दिल्या.

प्रतिवर्षी विजयादशमीच्या पर्वकालावर पोलीस मुख्यालयातील शस्त्रागार विभागात शस्त्रास्त्रांचे पूजन केले जाते. रविवारी नवमीच्या दिवशीच दसरा होता. मात्र, खरी दशमी सोमवारी असल्याने नाशिक पोलिसांनी यंदाही शस्त्रांस्त्रांचे विधीवत पूजन केले. शस्त्रांना झेंडूची फुले वाहून बॅण्ड पथकाच्या धूनवर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी आरती केली. यावेळी पुरोहितांनी मंत्रोच्चार करत शंखध्वनी केला. यावेळी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले, शस्त्रागार विभागाचे प्रमुख सुरेश चव्हाण आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -