घरताज्या घडामोडीनाशिकरोड पोलीस ‘स्टार ऑफ दी इयर’

नाशिकरोड पोलीस ‘स्टार ऑफ दी इयर’

Subscribe

आयुक्तालयाची परीक्षा : पंचवटी व्दितीय, सातपूर तृतीय

पोलीस आयुक्तालयातील १३ पोलीस ठाण्यांसाठी दैनंदिन कामकाजाशी संबंधित १४ मुद्द्यांवर घेण्यात आलेल्या पोलीस आयुक्तलयाच्या परिक्षेत नाशिकरोड पोलीस ठाण्याने प्रथम क्रमांक पटकाविला. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी स्टार ऑफ दी इयर’ पुरस्कार देवून सन्मानित केले. त्यांनी सन्मानचिन्ह देवून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली, निलेश माईनकर व अन्य अधिकारी-कर्मचार्‍यांचा गौरव केला.

सोमवारी (दि.१७) सकाळी ११ वाजता पोलीस आयुक्त कार्यालयात स्टार ऑफ दी इयर बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या संकल्पनेतून शहरातील विविध पोलीस ठाण्यांमधील कारभार सुधारण्याच्या दृष्टीकोनातून ‘स्टार ऑफ दी इयर’ परिक्षेव्दारे मूल्यांकन करण्यात आले. पोलीस ठाण्यात कामकाज सुधारणा, प्रभावीपणे कार्यवाही करणे, पोलीस ठाणेनिहाय गुणांकन व मुल्यांकन अशा १४ मुद्द्यांवर प्रश्नपत्रिका तयार करण्यात आली होती. त्यात गुण विभागणी व गुण पद्धत नियमावली तयार करुन शहरातील १३ पोलीस ठाण्याची एक जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१९ या कालवधीत कामकाज माहितीचा आढावा घेण्यात आला. नाशिकरोड पोलीस ठाण्याने २ हजार ५१२ गुण प्राप्त करुन प्रथम क्रमांक पटकविला. पंचवटी पोलीस ठाण्याने २ हजार ४४९ गुण प्राप्त करुन व्दितीय क्रमांक प्राप्त केला. तर सातपूर पोलीस ठाण्याने २ हजार ४४३ गुण प्राप्त करुन तृतीय क्रमांक पटकविला. पंचवटी पोलीस ठाण्याचे अशोक भगत आणि सातपूरचे राकेश हांडे यांनी पुरस्कार स्विकारला. असमाधानकारक कामगिरी करणार्‍या पोलीस ठाण्यास पोलीस आयुक्त नांगरे-पाटील यांनी कामकाजात सुधारणा करण्याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, उपायुक्त पोर्णिमा चौगुले-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisement -

वाहतूक शाखा युनीट दोन अव्वल
शहर वाहतूक शाखेकडील युनीट दोनने एक हजार ५०० गुणांपैकी ९८३ गुण प्राप्त करुन पहिला क्रमांक पटकावत पोलीस आयुक्तालयात अव्वल स्थान पटकावले. या मूल्यांकनामुळे पोलीस ठाणे व शहर वाहतूक शाखाअंतर्गत परीक्षा घेवून प्रभावी कामकाज करण्याची संकल्पना राबविली जात आहे. उत्कृष्ट काम करणार्‍या पोलीस ठाणे व शहर वाहतूक शाखेकडील युनीट यांना स्टार ऑफ दी इयर पुरस्कार पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

अशी आहे मूल्यांकन समिती
स्टार ऑफ दी इयर स्पर्धेचे काम प्रभावीपणे होण्यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, पौर्णिमा चौगुले, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांची मूल्यांकन समिती स्थापन करण्यात आली. समितीमध्ये पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, पौर्णिमा चौगुले, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांचा समावेश आहे. 

- Advertisement -

या १४ मुद्द्यांवर मूल्यांकन
गंभीर गुन्हे, खुनाचे गुन्हे, चांगली कामगिरी, प्रतिबंधक कारवाई, समन्स व वॉरंट बजावणे, वाहतूक उपाययोजना, गुन्हे, अर्ज निर्गती, मुद्देमाल निर्गती, कायदा व सुव्यवस्था, सीसीटीएनएस कामकाज, दोषसिद्धी प्रमाण, वेलफेयर अ‍ॅण्ड अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, डी.डी.ओ. फंड, क्युआर कोड, पोलीस ठाणे परिसर स्वच्छता या मुद्द्यांच्या आधारे ५ हजार गुणांचे मूल्यांकनपत्रिका तयार करुन त्याचे मूल्यांकन करण्यात आले.

टीमवर्कमुळे प्रथम
पोलीस उपायुक्त विजय खरात व सहाय्यक पोलीस आयुक्त ईश्वर वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी प्रामाणिकपणे नेमलेले कामकाज वेळेत पूर्ण केले. त्यामुळेच पोलीस ठाण्याचा प्रथम क्रमांक आला. सर्वच स्तरावर उत्कृष्ट कामकाज केल्याने समाधान वाटते. प्रथम क्रमांकामुळे कर्मचार्‍यांचा कामाचा उत्साह वाढला आहे.
सुरज बिजली  वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नाशिकरोड पोलीस ठाणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -