घरमहाराष्ट्रनाशिकमेट्रो रेल्वे नव्हे टायर बस धावणार

मेट्रो रेल्वे नव्हे टायर बस धावणार

Subscribe

मुंबई-पुण्याच्या रांगेत नेऊन ठेवण्याचे गाजर दाखविणार्‍या मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनाने नाशिककरांचा चांगलाच हिरमोड

मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या शहरात मेट्रो धावणार असल्याच्या बातमीने नाशिककर खूश असले तरीही, ही मेट्रो रेल्वे ट्रॅकवर नव्हे तर टायरवर धावणारी असेल. त्यामुळे मुंबई-पुण्याच्या रांगेत नेऊन ठेवण्याचे गाजर दाखविणार्‍या मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनाने नाशिककरांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.

मुंबईत मेट्रो धावली, पुणे नागपुरातही मेट्रोच काम वेगाने सुरू आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नाशिककरांनाही मेट्रोचे स्वप्न दाखवले जात आहे. याकरीता शहरातील रस्त्याची व्यवहार्यता तपासण्यात आली असून दोन ते तीन महीन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे. मात्र ही मेट्रो रेल्वे नसून टायर बेस मेट्रो म्हणजेच आर्टिक्युलेटेड बस असेल. त्यामुळे मेट्रोच्या नावाखाली नाशिककरांची फसवणुक होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. नाशिकचे पालकत्व स्विकारलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नाशिककरांना लवकरच मेट्रोचे गिफ्ट मिळणार आहे. लोकसभा निवडणुकींतील घवघवीत यशानंतर भाजप सरकारने विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करण्याकडे राज्य सरकारचा कल दिसत आहे. नाशिक महापालिकेत सत्ता हाती घेतल्यानंतर पुणे, नागपुर पाठोपाठ नाशिकमध्येही मेट्रो धावेत अस आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यादृष्टीने या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासणी पूर्ण झाली. डीपीआर बनवण्याचे काम सुरू आहे. पहील्या टप्प्यात ३१.४० किलोमीटर ही मेट्रो धावणार आहे. परंतु ही मेट्रो नसून टायर बस मेट्रो म्हणजेच आर्टिक्युलेटेड बस असेल. बॅटरीवर चालणार्‍या दोन बस एकमेकांना जोडलेल्या असतील.‘रॅपिड ट्रान्झिट सिस्टिम’ प्रणालीव्दारे ही सेवा कार्यरत होणार आहे. सुरूवातीला दोन मार्गांवर ही मेट्रो धावणार आहे.

- Advertisement -

असा असेल मार्ग

सातपूरमधील श्रमिकनगर ते खडकाळी सिग्नल, सारडा सर्कल, व्दारका चौक ते नाशिकरोड असा एक मार्ग राहणार आहे. सातपूर रोडवरील अमृत गार्डन चौकात या मार्गावरील मुख्य जंक्शन असणार आहे. तर दुसरा मार्ग मुंबईनाका, सीबीएस, अशोकस्तंभ ते गंगापूर गाव असा असेल. मुंबईनाक्यावर दुसरे जंक्शन असणार आहे. या दोन्ही मार्गांव्यतिरिक्त २४ फिडर रूटचा अवलंब केला जाणार आहे. त्यात रविवार कारंजा, पंचवटी कारंजा अशा जुन्या नाशिकमधून पुढे नांदूर नाक्याकडे बसेस धावू शकतील.

मेट्रोला २९ थांबे

या दोन्ही मार्गांना जोडणारा लूप बारदान फाटा ते श्रमिकनगर या दरम्यान असणार आहे. दोन्ही मार्ग मिळून २९ थांबे असणार आहे. पॅसेंजर अवर पर डायरेक्शन ट्रान्सपोर्ट या तत्वानूसार या मार्गांची निवड करण्यात आली आहे. या दोन्ही मार्गांवर प्रवासी वाहतूकीची संख्या आठ हजार आहे हे प्रमाण साधारणपणे २०हजार असते तर मेट्रो सुरू करता आली असती मात्र सध्या टायर बेस मेट्रोवरच नाशिककरांना समाधान मानावे लागणार आहे.

- Advertisement -

मेट्रोसाठी वातानुकुलीत बस

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून मेट्रोची मुर्हूतमेढ रोवली जात आहे. नाशिक महापालिकेच्या माध्यमातून बससेवा सुरू केली जाणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मनपा परिवहन सेवेसाठी ४०० बसेस खरेदी करणार आहे त्यातूनच मेट्रोसाठी वातानुकुलीत बस वापरल्या जातील अशीही शक्यता व्यक्त होते आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -