घरमहाराष्ट्रनाशिकजनार्दन स्वामींचे प्रथम शिष्य स्वामी माउलीबाबांचे महानिर्वाण

जनार्दन स्वामींचे प्रथम शिष्य स्वामी माउलीबाबांचे महानिर्वाण

Subscribe

राष्ट्रसंत जनार्दन स्वामींचे प्रथम शिष्य परमपूज्य ज्ञानगिरीजी महाराज ऊर्फ माउलीबाबा (९०) यांचे गोवर्धन (ता. नाशिक) शिवारातील गोवर्धनेश्वर मंदिरात बुधवारी सकाळी ८ वाजता महानिर्वाण झाले.

राष्ट्रसंत जनार्दन स्वामींचे प्रथम शिष्य परमपूज्य ज्ञानगिरीजी महाराज ऊर्फ माउलीबाबा (९०) यांचे गोवर्धन (ता. नाशिक) शिवारातील गोवर्धनेश्वर मंदिरात बुधवारी सकाळी ८ वाजता महानिर्वाण झाले. त्यांचा समाधी सोहळा मान्यवर साधुसंतांच्या उपस्थितीत दुपारी अडीच वाजता पार पडला.

येवला तालुक्यातील अंदरसूल येथील जन्मभूमी असलेल्या माउलीबाबांनी राष्ट्रसंत जनार्दनस्वामी हयात असताना त्यांच्यासोबत राहून त्यांच्या फलाहाराचीदेखील अनेक दिवस सेवा केलेली आहे. जनार्दन स्वामींच्या देहावसानानंतर ते गोवर्धन येथील गोदावरीच्या किनारी वसलेल्या मंदिरात वास्तव्यास होते. त्यांचे सकाळी अल्पश: आजाराने निधन झाले. त्यांचा समाधी सोहळा मंदिर परिसरातच मान्यवरांच्या उपस्थितीत वेदमंत्रांच्या जयघोषात पार पडला. प्रसिद्धपराड्मुख असलेल्या माउलीबाबा यांनी गोवर्धन येथे राष्ट्रसंत सदगुरू जनार्दनस्वामी वैदिक पाठशाळा सुरू केली. या ठिकाणी अनेक विद्यार्थी वेदांचे अध्ययन करत आहेत. माउलीबाबांना विविध प्रजातीच्या वृक्षांविषयी सखोल माहिती होती. त्यांनी अनेक ठिकाणी दुर्मीळ वृक्षांचे व्यवस्थितरीत्या संगोपन केले आहे. त्यामुळे जनार्दनस्वामींनीदेखील अनेक आश्रमांत त्यांच्या हातून विविध प्रकारच्या वृक्षांचे रोपण करून घेतले आहे.

- Advertisement -

वृक्षप्रेमी असलेल्या माउलीबाबा यांचे जागतिक पर्यावरण दिनीच महानिर्वाण होणे हादेखील एक योगायोगच असल्याची भावना भक्तपरिवाराने व्यक्त केली. याप्रसंगी स्वामी माधवगिरी महाराज, रमेशगिरी महाराज, संतोषगिरी महाराज, महामंडलेश्वर शिवगिरी महाराज, परमानंदगिरी महाराज, भोलेगिरी महाराज, तपोवन आश्रमाचे विश्वस्त मधुकर जेजुरकर, भाऊ पाटील, शिवाजी पाटील, चंद्रकांत पाटील, दौलत पाटील, मुरलीधर पाटील यांच्यासह जनार्दनस्वामींचा मोठा भक्त परिवार उपस्थित होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -