घरमहाराष्ट्रनाशिकसौरऊर्जेच्या वापरातून मनपाने वाचवली ६०% वीज; ४८लाखांचीही बचत

सौरऊर्जेच्या वापरातून मनपाने वाचवली ६०% वीज; ४८लाखांचीही बचत

Subscribe

नाशिक मनपाने बसवले आहेत आपल्या सर्व कार्यालयावर सोलर पॅनल

नाशिक : महावितरण कंपनीने एकीकडे कोळशाअभावी भारनियमन सुरू करण्याची तयारी केली असताना, नाशिक महापालिकेची वाटचाल मात्र विजेच्या बाबतीत आत्मनिर्भरतेकडे सुरू आहे. स्मार्ट सिटी आणि महापालिकेने विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी सौर ऊर्जा पॅनल बसवले असून, त्याचा फायदा आता पालिकेला होताना दिसत आहे.

महापालिकेने आपल्या कार्यालयांवर पर्यावरणपूरक रूफ टॉप सोलर पॉवर यंत्रणा साकारल्यामुळे महापालिकेची आता दरवर्षी ६० टक्के वीजबचत होत आहे. या यंत्रणेमुळे महापालिकेचे वार्षिक बिल हे ६६ लाखांवरून १८ लाखांवर येवून ठेपले असून, त्यामुळे पालिकेची जवळपास ४८ लाखांची बचत होत आहे.’ कंपनी आणि पालिकेमध्ये २५ वर्षांचा करार झाला आहे. संबंधित कंपनीने महापालिकेच्या मुख्यालयासह विभागीय कार्यालये यासह दहा ठिकाणच्या इमारतींच्या छतावर रूफ टॉप सोलर यंत्रणा बसवली आहे. त्यातून दररोज सुमारे ३६५ किलोवॉट वीजनिर्मिती होत आहे. अर्थात, सूर्यप्रकाशावर अवलंबून असल्याने कमी-जास्त प्रमाण असते.

- Advertisement -

महापालिकेने ‘वारी सोलर’ या कंपनीच्या सहकार्याने राजीव गांधी भवन मुख्यालयावर बसविलेल्या यंत्रणेद्वारे २१० किलोवॉट वीज तयार होते. त्याचबरोबर पंचवटी विभागीय कार्यालय ६०, सिडको विभागीय कार्यालय १५, जिजामाता हॉस्पिटल १५, नाशिकरोड विभागीय कार्यालय ६० किलोवॉट, तर कालिदास आणि फाळके स्मारक येथे सुमारे ३० किलोवॉट इतकी वीजनिर्मिती होत आहे. एकूण १६ ठिकाणी ही यंत्रणा असून, ही निर्माण होणारी वीज महावितरण कंपनीच्या रिव्हर्सेबल मिटरला जोडण्यात आली असून, महापालिकेकडून महावितरणच्या वापर होणाऱ्या विजेतून मनपात तयार होणारी वीज वजा केली जाते.

नेमकी प्रक्रिया काय

- Advertisement -

‘पीपीपी’ तत्त्वावर साकारलेल्या योजनेअंतर्गत बचत होणाऱ्या विजेवर प्रतियुनिट ४.५९ रुपये संबंधित कंपनीला दिले जातात. महापालिकेला महावितरणकडून ११ रुपये दराने प्रतियुनिट वीज आकारणीकेली जात असून, ६० = टक्के वीजबचत होत असेल, तर त्यातून प्रतियुनिट साडेचार रुपये कंपनीला मोजून उर्वरित साडेसहा रुपये मनपाची प्रतियुनिट बचत होत असल्याने मनपाची मोठ्या प्रमाणावर आर्थिक बचतदेखील साध्य होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -