नायलॉन मांजा विक्रेत्यांना अटक;३९ रिळ जप्त

नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट्सची कारवाई

नाशिक : शहरात नायलॉन मांजामुळे सातपूर आणि उपनगरमध्ये चार नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडल्यानंतर शहर पोलीस सतर्क झाले आहेत. या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शहर गुन्हे शाखेने थेट कारवाईला सुरुवात केली आहे. या अंतर्गत पथकांनी नवीन नाशिक व जेलरोड येथील दोन नायलॉन मांजा विक्रेत्यांना अटक केली.

पथकाने त्याच्या ताब्यातून नायलॉन मांजाचे ३९ गट्टू आणि नायलॉन मांजाने भरलेल्या फिरक्या १९ हजारांचा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. निशांत किशोर सोनकर (वय २२, रा. महाराणा प्रताप चौक, नवीन नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या मांजा विक्रेत्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतंग उडवण्यासाठी बंदी असलेला नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी दिल्या आहेत. त्यानुसार नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकचे पथक गस्त घालत होते. संशयित निशांत सोनकर हा महाराणा प्रताप चौक, नवीन नाशिकमध्ये नायलॉन मांजा विक्री करत असल्याची माहिती पोलीस कर्मचारी नाझीम पठाण यांना मिळाली. पथकाने पठाण याला ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत त्याने नायलॉन मांजाचे गट्टू विक्रीस आणल्याची कबुली दिली. अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.