घरताज्या घडामोडी’नामको’च्या सभासदांना 7.5 कोटींचा लाभांश

’नामको’च्या सभासदांना 7.5 कोटींचा लाभांश

Subscribe

औद्योगिक क्षेत्रातील नामांकित नाशिक मर्चंट्स कोऑपरेटिव्ह (नामको) बँकेवरील निर्बंध ’आरबीआय’ने हटवल्यामुळे बँकेच्या एक लाख 80 हजार सभासदांना 15 टक्के लाभांश दिला जाणार आहे. ठेवींच्या आधारे सर्व सभासदांना सात कोटी 52 लाख रुपये वाटप केले जाणार असून, कर्ज वितरणाची मर्यादा दुप्पट झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नामको’ बँकेचे तत्कालिन अध्यक्ष हुकमचंद बागमार यांनी बँकेच्या नफ्यातील एक टक्के (23 लाख रु.) रक्कम महावीर धर्मार्थ दवाखान्यास देगणी दिली होती. या विरोधात ’आरबीआय’कडे तक्रार दाखल होताच महाव्यवस्थापक कृष्णास्वामी यांनी बँकेवर भोरीया यांची प्रशासक म्हणून नियुक्त केली. प्रशासकांच्या कार्यकाळात 50 कर्जदारांना 213 कोटी रुपये चुकिच्या पध्दतीने वितरीत झाले आहेत. बँकेचे कर्ज थकवणार्‍या या कर्जदारांकडून वसूलीसाठी प्रयत्न सुरु आहेत. तसेच भोरीया यांच्या विरोधात न्यायालयात लढा देण्याची तयारी चालू झाली असून, बँकेनी त्यांच्या विरोधात याचिका दाखल करायची की, सभासदांनी याविषयी संचालक मंडळामध्ये विचारविनियम सुरु असल्याचे भंडारी यांनी सांगितले.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -