घरताज्या घडामोडीकरोनाग्रस्त रुग्णावर चीन सरकारचा 'हा' भीषण उपाय?

करोनाग्रस्त रुग्णावर चीन सरकारचा ‘हा’ भीषण उपाय?

Subscribe

चीन सरकार जगाला फसवतं आहे का? असा प्रश्न सध्या जगासमोर आहे.

चीनमध्ये करोना व्हायरसने थैमान घातले असून तेथील नागरिकांचं जगणं मुश्कील झालं आहे. सध्या जगाला करोना व्हायरस दहशत आहे. अनेक देशांनी चीनमधील आपल्या नागरिकांना पुन्हा मायदेशी आणलं आहे. तसंच या करोना व्हायरसमुळे जगातील सर्व विमानतळ हाय अलर्टवर आहेत. चीन हा लोकसंख्येचा दृष्टीकोनातून जगातील पहिल्या क्रमांकाचा देश आहे. मात्र करोना व्हायरसमुळे चीनमधील नागरिक बळी पडतं आहे. चीन सरकारने आतापर्यंत मृतांचा आकडा हा ११०० इतकाचं सांगितला आहे. पण चीनमधील वृत्तपत्र करोना व्हायरसमुळे बळी पडलेला आकडा हा वेगळा सांगत आहे. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर सध्या चीननं ५० हजार करोनाग्रस्तांना जाळलं असल्याचे उघडकीस आलं आहे. तर २० कोटी नागरिक करोनाच्या विळख्यात सापडले असल्याचं समोर येत आहे.

वुहान मधील नागरिक गेले कुठे?

तसंच सध्या चीनमधील वुहान शहर सुन्न झालं आहे. रस्त्यावरील माणसं गायब झाली आहेत. त्यामुळे १ कोटी १० लाख लोकसंख्या असलेल्या वुहान शहरातील नागरिक गेले तरी कुठे असा प्रश्न जगासमोर आहे. या प्रश्नाचं उत्तर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून समोर आलं आहे. चीनी सरकारने लोकांच्या घराला चक्क पिंजरा बनवलं आहे. काही अर्पाटमेंटचे गेट वेलडिंग करू बंद केलेत, तर काही घराचे दरवाजे उघडणार नाहीत अशा प्रकारे व्यवस्था केली आहे. चीनी सरकारच्या आणि सोशल मीडियाच्या आकडेवारीमध्ये खूप मोठी तफावत असल्याने चीन सरकार ही जगाची फसवणूक तर करत नाहीना असा प्रश्न उपस्थित होत.

- Advertisement -

 

हेही वाचा – करोनाचा विळखा वाढला, आत्तापर्यंत ७२२ बळी!

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -