तिहेरी अपघातात एक ठार, दोघे जखमी

दिंडोरी तालुक्यातील ढकांबे शिवारातील घटना

दिंडोरी तालुक्यातील ढकांबे शिवारात नाशिक वनी रस्त्यावर आज दुपारी एक वाजेच्या सुमारास तीन वाहनांच्या अपघातात एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत वृत्त असे की, आज दुपारी एक वाजेच्या सुमारास गुजरात वरून नाशिककडे जाणारी गुजरात परिवहन महामंडळाची बस, आयशर व हुंदाई वरणा या तीन वाहनांचा विचित्र अपघात होऊन या अपघातात गुजरात येथील राम सागर बिंना लाल वय(27) हे ठार झाले तसेच इतर दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी दिलीप पगार जाधव अधिक तपास करीत आहे.