घरमहाराष्ट्रनाशिकयेवला, अंदरसूलला कांदा आवक घटली

येवला, अंदरसूलला कांदा आवक घटली

Subscribe

बाकी शेतमालाचे बाजारभाव मात्र स्थिर

येवला व अंदरसूल मार्केट यार्डवर कांदा आवकेत घट दिसून आली तर बाकी बाजारभाव स्थिर असल्याचे समजते.

कांदा : सप्ताहात येवला व अंदरसुल मार्केट यार्डवर उन्हाळ कांदा आवकेत घट झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल तामिळनाडू, केरळ, आा्ंर प्रदेश इत्यादी राज्यात व परदेशात मागणी सर्वसाधारण होती. सप्ताहात एकुण कांदा आवक ३७९११ क्विंटल झाली असुन उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान रु. ४०० ते कमाल रु. १९४१ तर सरासरी रु. १६५० प्रति क्विंटल पर्यंत होते. तसेच उपबाजार अंदरसुल येथे कांद्याची एकुण आवक २३८६६ क्विंटल झाली असुन उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान रु. ३०० ते कमाल रु. १९०१ तर सरासरी रु. १६५० प्रति क्विंटल पर्यंत होते.

- Advertisement -

गहू : सप्ताहात गव्हाची आवक टिकून होती तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. गव्हास स्थानिक व्यापारी वर्गाची व देशांतर्गत मागणी सर्वसााारण राहील्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात गव्हाची एकुण आवक १६८ क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान रु. १५०० ते कमाल रु. १९५३ तर सरासरी रु. १६५० पर्यंत होते.

बाजरी : सप्ताहात बाजरीच्या आवकेत वाढ झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. बाजरीस स्थानिक व्यापारी वर्गाची मागणी सर्वसााारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात बाजरीची एकुण आवक २१५ क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान रु. १३०० ते कमाल रु. १६०१ तर सरासरी रु. १३५० पर्यंत होते.

- Advertisement -

हरभरा : सप्ताहात हरभ-याच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. हरबर्‍यास व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते सप्ताहात हरभ-याची एकुण आवक ४८ क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान रु. ४३०१ ते कमाल रु. ५२०२ तर सरासरी रु. ४७०० पर्यंत होते.

तूर : सप्ताहात तुरीच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. तुरीस व्यापारी वर्गाची मागणी सर्वसााारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात तुरीची एकुण आवक ८ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान रु. ३७५० ते कमाल रु. ५५०० तर सरासरी रु. ५००० पर्यंत होते.

सोयाबीन : सप्ताहात सोयाबीनच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव तेजीत असल्याचे दिसुन आले. सोयबीनला स्थानिक व्यापारी वर्गाची मागणी चांगली राहिल्याने बाजारभाव तेजीत होते. सप्ताहात सोयाबीनची एकुण आवक २५ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान रु. ५९०० ते कमाल रु. ७४७० तर सरासरी रु. ७००० पर्यंत होते.

मका : सप्ताहात मकाच्या आवकेत घट झाली तर बाजारभावात वाढ झाल्याचे दिसुन आले. मकास व्यापारी वर्गाची मागणी चांगली राहिल्याने बाजारभावात वाढ झाली. सप्ताहात मक्याची एकुण आवक ७०२ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान रु. १३४० ते कमाल रु. १७०० तर सरासरी रु. १६६१ प्रति क्विंटल पर्यंत असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव के. आर. व्यापारे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -