घरक्राइमनाशकात तळीरामांना ‘एक्साईज’चा ऑनलाइन ‘आधार’

नाशकात तळीरामांना ‘एक्साईज’चा ऑनलाइन ‘आधार’

Subscribe

७ हजार ३३३ जणांना मिळाला मद्य पिण्याचा परवाना, ५३ लाख ७१ हजारांचा महसूल

नाशिक जिल्ह्यातील ७ हजार ३३३ तळीरामांना देशी-विदेशी मद्य पिणे, खरेदी आणि जवळ बाळगण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग (एक्साईज), नाशिकतर्फे ऑनलाईन मद्य पिण्याचा परवाना देण्यात आला आहे. दोन वर्षांत एक्साईजला वार्षिक परवान्यातून २ लाख १७ हजार ९०० रुपये आणि कायमस्वरुपी परवान्यातून ५१ लाख ५४ हजार रुपये असे एकूण ५३ लाख ७१ हजार ९०० रुपये महसूल मिळाला आहे. त्यातून एक्साईज मालामाल झाला आहे.

देशी-विदेशी मद्याच्या विक्रीसाठी विक्रेत्याला परवाना आवश्यक आहे. तसाच मद्य खरेदीसाठी ग्राहकांनासुद्धा परवाना बंधनकारक करण्यात आला आहे. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासह वर्षभरात विविध कार्यक्रमानिमित्त नागरिक मित्रांसमवेत मद्याची पार्टी आयोजित करतात. ऐनवेळीस पोलिसांकडून आणि एक्साईजकडून पार्टीत अडथळा नको, यासाठी नाशिकमधील नागरिकांनी मद्य पिण्याचा परवाना मिळण्यासाठी एक्साईजकडे ऑनलाइन अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे, एक्साईजच्या कार्यालयात जाऊन परवाना काढण्यास अनेकजणांनी नापसंती दर्शवल्याचे आकडेवारीवरुन समोर आले आहे.

- Advertisement -

नागरिकांना एक्साईजकडून https://exciseservices.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर मद्य परवाना ऑनलाइन पद्धतीने देण्यात येत आहे. त्यासाठी फोटो, आधारकार्ड पुरावा म्हणून आवश्यक आहे. त्यानंतर कायमस्वरुपी, एक वर्षाचा किंवा एक दिवसाचा परवाना दिला जात आहे. वार्षिक परवान्यासाठी शंभर रुपये आणि कायमस्वरुपी परवान्यासाठी एक हजार रुपये शुल्क आकारले जात आहे. हे शुल्क नेट बँकिंग, डेबिट, क्रेडिट कार्डव्दारे भरण्याचे पर्याय आहेत. त्यानंतर सात दिवसांत परवाना ऑनलाइन दिला जात आहे.

८० टक्के विनापरवानाधारक

नाशिक जिल्ह्यात मद्य खरेदी करणार्‍यांपैकी सुमारे ८० टक्के नागरिकांकडे मद्य पिण्याच्या परवाना नाही. मद्याचा परवाना काढल्याने ओळखीच्या व्यक्तींना आवडेल की नाही, याबाबत साशंकता असल्याने अनेकजण परवाना काढण्याकरिता एक्साईजच्या कार्यालयात जाणे टाळत आहेत. नागरिकांना एक दिवसासाठी परवाना मद्य विक्रीच्या ठिकाणीच्या दिला जात आहे. त्यासाठी पाच रुपये शुल्क आकारले जात आहे. मात्र, एक्साईजकडून प्रत्येक मद्य विक्रीच्या दुकानांवर वॉच नसल्याने मद्य विक्रेते आणि खरेदी करणारे ग्राहकही एक दिवसाच्या परवान्याकडे दुर्लक्ष करत आहेत.

- Advertisement -

मद्य परवानाधारकांची आकडेवारी

वर्ष कायमस्वरुपी वार्षिक
2020 1915 670
2021 3239 1509
एकूण 5154 2179

Sushant Kirve
Sushant Kirvehttps://www.mymahanagar.com/author/ksushant/
गेल्या १२ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. क्राईम, आरोग्य, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लिखाण. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेण्या अपघातांमध्ये घट होण्यासाठी सातत्याने लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -