घरताज्या घडामोडीमित्राने मित्राच्या घराखाली स्फोटकांची गाडी का ठेवली? याचा शोध लागल्यास फटाक्यांची माळ...

मित्राने मित्राच्या घराखाली स्फोटकांची गाडी का ठेवली? याचा शोध लागल्यास फटाक्यांची माळ लागेल, राज ठाकरेंचे वक्तव्य

Subscribe

देशातील प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांची गाडी ठेवल्याच्या प्रकरणाला आता वर्ष होण्यास आले आहे. परंतु स्फोटके असलेली गाडी का ठेवण्यात आली? याचा अद्याप शोध लागला नाही. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुकेश अंबानी हे चांगले मित्र आहेत. तर स्फोटके ठेवणारा सचिन वाझे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंचा मित्र आहे. तर मग मित्रानं मित्राच्या घराखाळी स्फोट पदार्थ असलेली गाडी का ठेवली? याचा जर शोध लागला तर फटाक्यांची माळ लागेल असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. औरंगाबाद दौऱ्याचा आज राज ठाकरेंचा दुसरा दिवस आहे. यावेळी ते माध्यमांशी चर्चा करताना त्यांनी अनेक विषयांवर आपले मत मांडले आहे. तसेच अंटिलीया प्रकऱणाबाबात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, सचिन वाझे ६ महिने तुरुंगात होते जवळपास ७ वर्ष बडतर्फ होते. त्यानंतर त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला. शिवसेनेचे कार्याध्यक्षांच्या जवळची व्यक्ती म्हणून त्यांना ओळखले जायचे. मुकेश अंबानी हे आताचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे कार्याअध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. आता एक जवळचा व्यक्ती दुसऱ्या जवळच्या व्यक्तीच्या घराच्या खाली बॉम्ब लावतो मला याचा अर्थच अजूनपर्यंत लागला नाही. त्याचे उत्तर जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत पुढची उत्तरे काय हे समजणार नाही असे राज ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

अंबानीच्या घराजवळील सुरक्षा व्यवस्था चोख

दरम्यान राज ठाकरे यांनी या विषयातील चौकशी आणि त्यानंतर समोर आलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख खंडणी प्रकरणाचा अप्रत्यक्ष उल्लेख करत म्हटलं आहे की, मूळ विषय राहिल बाजूला आणि हे प्रकरण कुठेतरी भरकटत नेतील आणि मूळ विषयावर कधी येणार नाहीत. विषय कधी सुरु झाला घराच्या खाली जिलेटीन ठेवल्यावर, मुकेश अंबानी यांच्या घराजवळची सुरक्षा अत्यंत चोख आहे. जर एखादी व्यक्ती दोनवेळा त्या रोडवरुन गेला तर त्याची चौकशी होईल. अशा परिस्थितीमध्ये एक माणूस तिकडे जातो.. गाडी लावतो.. गाडी लावल्यावर परत येतो.. आणि मग चिठ्ठी ठेवतो …परत जातो.. याची उत्तरे काय? याचे उत्तरच सापडत नाही असे राज ठाकरे म्हणाले.

मित्रानेच स्फोटकांची गाडी का ठेवली

जर वाझेने गाडी ठेवली आहे. वाझे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा जवळचा माणूस आहे. मुकेश अंबानी मुख्यमंत्र्यांचे मित्र आहेत तर मग वाझेने तिथे जाऊन स्फोटकांची गाडी का ठेवली? हा साधा सरळ प्रश्न आहे त्याचे उत्तर अद्यापही येत नाही. यामुळे माझे स्पष्ट मत आहे. जिथून सुरु झाले आहे. त्याचा शोध लागला तर फटाक्यांची माळ लागेल असे मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : अनिल देशमुखांनी कधीच पैशांची मागणी केली नाही; चांदीवाल आयोगासमोर सचिन वाझेचा मोठा खुलासा


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -