कृषी सेवा केंद्र सुरु ठेवण्याचे आदेश

जिल्हा कृषी अधिकारी घेणार दैनंदिन आढावा; शेती मशागतीच्या कामांना वेग

farmer
प्रातिनिधिक फोटो

नाशिक : करोनामुळे शेतकर्‍यांचा आगामी खरीप हंगाम वाया जावू नये म्हणून जिल्हा प्रशासनाच्यावतीने कृषी सेवा केंद्र सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे पत्र काढण्यात आले असून, तालुकानिहाय आदेश देण्यात आले आहे. यासंदर्भात दरदोरज अहवाल देखील मागविला जात असल्याचे जिल्हा कृषी अधिकारी रमेश शिंदे यांनी सांगितले. देशासह राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. या संचारबंदीच्या काळात ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील सर्व कामे ठप्प झाली होती. शेतीची मशागत तसेच हरभर, गहू आदी पिके कापणीला आली होती. शेतकर्‍यांवरील वाढते संकट लक्षात घेऊन काही दिवसापूर्वी अशी शेतीकामे करण्याची मूभा देण्यात आली होती. कामे करतांना गर्दी करू नये, एकाच ठिकाणी मजूरांचा घोळका होऊ नये व सामाजिक अंतर पाळण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानंतर, ग्रामीण भागात गहू काढण्याचे कामांनी वेग धरला आहे, हरभरा पीकाची काढणीही सुरू झाली आहे. आता मशागतीचा व यंत्रे तयार करून ठेवण्याची वेळ असल्याने प्रशासनाने प्रतिबंधात्मक कायद्यातील काही तरतूदीचा आधार घेत कृषी सेवा केंद्र सुरू करण्याचे परवानगी देण्यात आली आहे.